तीन राजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मागी लोक ( तीन राजे) नक्की कोण होते ?

मागी लोक नक्की कोण होते ? ते राजे तर नक्कीच नव्हते. मागी हा शब्द मागोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. याचा अर्थ ज्ञानी पुरुष, स्वप्नांचा अर्थ सागणारा माणूस किवा ग्रह ताऱ्या वरून घटनांचा अर्थ लावणारा माणूस.पहिल्याने मागी लोक म्हणजे पारसी (झोरास्तीयन्स) यापैकी एक वर्ग होता. हे लोक झोरास्तीयन (पारसी) धर्मात पुरोहिताचे काम करीत. हे लोक जोतिषशास्त्र आणि स्वप्नखुलासा यात प्रवीण होते. या शास्त्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. यावरून पुढे मूळ शब्दाचा अर्थविस्तार झाला व पहिल्या शतकात मागी व खास्दी हे शब्द भूमध्य सागरी जगात सर्वेच जोतिषी व खाजगी विशिष्ट धर्मे पंथाचे भाष्यकार यांना लावीत. प्रेषितांची कृत्ये ८-९ मध्ये शिमोन जादुगार असे आहे. ते मुळात शिमोन मागस असे आहे. मागस = मागी, प्रेषितांची कृत्ये १३-८ मध्ये अलीम असे आहे. अलीम + मागस = मागी. या शब्दाचा मूळ अर्थ मत्तय २:१ मध्ये आहे. म्हणजे पूर्वेकडील ज्ञानी लोक. शुभवर्तमानात ज्ञानी लोक किती होते हे सागितले नाही. परंतु त्यांनी प्रभू ख्रिस्ताला तीन भेटी दिल्या म्हणून ते तीन जण होते असे परंपरेने मानले जाते. काही दंतकथेत ते १२ जण होते असे मानले जाते. बहुदा ते तसे असेल कारण तेव्हा लोक मोठ्या टोळीने लांबचा प्रवास करीत. पण १२ पैकी फक्त तीनच जण ख्रिस्तापर्यंत पोहोचले असे दंतकथेत नमूद आहे. बहुदा ते अरेबिया, मेसोपोटेमिया (आताचा इराक, इराणचा प्रदेश) किवा बाबिलोनमधून आले होते. ते राजे नव्हते परंतु हळूहळू त्यांना राजे मानले जाऊ लागले व त्यांच्या दंतकथा बनल्या. त्यांची नावेही दंतकथेत दिसून येतात ती अशी : कॅस्पर, मल्किओर, आणि बाल्ताझार. [१]

नजराणे ज्ञानी लोकांकडून

संत मत्तय आपल्या शुभवर्तमानात असें सागतो कि पूर्वेच्या आकाशात तारा पाहुन ज्ञानी लोक (मागी लोक) तारण कर्त्याच्या शोधात निघाले. (मत्तय २:२). हा आगळावेगळा राजा कुठे जन्मला आहे, याविषयी त्यांनी हेरोद राजाच्या राजधानीत (जेरुसलेम) विचारणा केली. राजाकडून माहिती घेऊन ते त्यांच्या मार्गी लागले. तोच काय आश्चर्य जो तारा त्यांनी पहिला होता तो त्यांना पुन्हा दिसू लागला आणि ज्या ठिकाणी बाळ जन्मले होते त्या जागेवर येऊन तो स्थिरावला. (मत्तय : २:९-११).

परंतु एफ्राता म्हटलेल्या हे बेंथलेहेमा, यहुदा प्रांतातील जमातीहून तू काही कमी नाहीस. तुझ्यातून माझ्याकरिता जो जन्मास येईल तो माझ्यावर राज्य करील.” (मिखा : ५:२-३). भविष्यवादी मिखा याच्या या भविष्यावर त्यांनी अगोदरच चिंतन केल्यामुळे जो जन्मला आहे तो राजा आहे अशी त्याची सुरुवातीपासूनच धारणा झाली होती. म्हणून या ज्ञानी लोकांनी येताना सोबत येशूबाळासाठी सोने, ऊद व गंधरस असें नजराणे आणले होते. सदर दृष्य प्रतीत करणारे एक मोझेयिक चित्र इथल्या चर्चमध्ये पूर्वापार होते., ते चढाई करून आलेल्या पर्शियन शत्रूंनी पाहिले. या ज्ञानी लोकांची वेशभूषा त्यांना इराणमधील त्यांच्या देशबांधवांच्या वेशभूषेसारखीच वाटली. या महत्त्वाच्या कारणावरून त्यांनी या ख्रिस्त मंदिराची नासधूस करण्याचा विचार सोडून दिला. येशूच्या जन्मस्थलाच्या उजव्या बाजूला या ज्ञानी लोकांचे स्थान दर्शविण्यात आले आहे.' <ref>फादर फ्रान्सीस कोरीया. (इस्राएल).

  1. ^ (पवित्रशास्त्र शब्दकोश) (झेप येशूची २००० वर्षाकडे - फादर हिलरी फर्नांडीस).