Jump to content

तिसरे कर्नाटक युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिसरे कर्नाटक युद्ध
कर्नाटक युद्धे ह्या युद्धाचा भाग
प्लासीच्या लढाईनंतर क्लाईव्ह आणि मीरजाफरची भेट (फ्रान्सिस हेमन याने इ.स. १७६२ साली काढलेले तैलचित्र)
प्लासीच्या लढाईनंतर क्लाईव्ह आणि मीरजाफरची भेट (फ्रान्सिस हेमन याने इ.स. १७६२ साली काढलेले तैलचित्र)
दिनांक इ.स. १७५८ ते इ.स. १७६३
स्थान कर्नाटक, भारत
परिणती पॅरीसचा तह (इ.स. १७६३)
युद्धमान पक्ष
ग्रेट ब्रिटन
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी
फ्रांस
फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी
सेनापती

तिसरे कर्नाटक युद्ध (मराठी नामभेद: कर्नाटकातील तिसरा इंग्रज-फ्रेंच संघर्ष ; इंग्रजी: Third Carnatic War, थर्ड कर्नाटिक वॉर) हे कर्नाटक युद्धे मालिकेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक प्रांतात इ.स. १७५८ ते इ.स. १७६३ या कालावधीत झालेले युद्ध होते. या युद्धात इंग्रजांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व फ्रेंचांच्या वतीने त्यांची भारतातील व्यापारी कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांनी सहभाग घेतला.[१]

पार्श्वभूमी

[संपादन]

इ.स. १७५६ साली युरोपातील प्रमुख सत्ता सप्तवार्षिक युद्धात गुंतल्या. इंग्लंड व फ्रान्स परंपरागत शत्रू असल्याने ते परस्परविरोधी गटांना साहाय्यक म्हणून जाऊन मिळाले. दुसऱ्या कर्नाटक युद्धानंतर इंग्लंड आणि फ्रान्स सरकारच्या आदेशावरून सॅंडर्स आणि गोडेहू या भारतातील अनुक्रमे इंग्लिश आणि फ्रेंच व्यापारी कंपन्यांच्या गव्हर्नर्सनी आपापसात जो शांतता करार केला होता तो संपुष्टात आला आणि कर्नाटकचे तिसरे युद्ध उद्भवले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "British Trading Company and Indian Allies — versus — French Trading Company and Indian Allies" (इंग्रजी भाषेत). 2013-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ ऑकटोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)