फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी (फ्रेंच:कंपनी फ्रांसेस पूर ल कॉमर्स देस इंडेस ओरियेंतालेस) ही इ.स. १६६४मध्ये स्थापन झालेली फ्रेंच कंपनी होती. लुई चौदाव्याकडून परवानगी मिळाल्यावर या कंपनीची स्थापना याआधीच्या कंपनी दे मादागास्कर, कंपनी दोरियेंट आणि कंपनी दे चाइन या तीन कंपन्यांचे एकत्रीकरण करून झाली. हीचा मुख्य उद्देश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीडच ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा करून भारतातील तसेच भारताशी होणाऱ्या व्यापाराचा भाग मिळवण्याचा होता. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीस दोन कंपन्यांइतके यश मिळाले नाही व इ.स. १७९४मध्ये ही कंपनी बरखास्त करण्यात आली.