ताज कोनेमारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताज कॉनेमारा हे पचंतारांकित आणि आलिशान हॉटेल भारतातील चेन्नई शहरात आहे. ताज समूहाचे हे हॉटेल चेन्नईमधील सगळ्यात जुन्या हॉटेलांपैकी एक आहे.[१][२]

इतिहास[संपादन]

१८५४ मध्ये ट्रीप्लीकेन राठीनावेलू मुदलियार यांच्या मालकीचे असलेले हे हॉटेल पूर्वी इम्पेरीअल या नावाने ओळखले जात होते. १८८६ मध्ये त्याचे नामकरण अलबनी असे करण्यात आले. या हॉटेलला त्यानंतरच्या पिढीतील मुदलियार बंधूनी भाडयाने चालवायला घेतले. १८८१-१८८६ च्या सुमारास आयर्लंड मधील कोनेमाराचे सम्राट, रार्बट बौर्क व मद्रासचे राज्यपाल यांनी या हॉटेलचे नामकरण कॉनेमारा असे केले. १८९९-१८९० मध्ये द कॉनेमारा या नावाने प्रसिद्धीस आले. [३][४] नंतर ते स्पेंसरच्या मालकीचे बनले. १८९१ मध्ये अन्ना सर्कल जवळ एक छोटेखानी दुकान असलेल्या युजेन ऑकशॉट यांनी हे हॉटेल खरेदी केले आणि ९ एकराच्या परिसरात एक मोठे वस्तुभांडार (डिपार्टमेंटल स्टोर) बांधले.

१९३० मध्ये स्पेन्सरचा संचालक जेम्स स्टीव्हन यांनी या हॉटेलचे आधुनिकीकरण करण्याचे ठरविले व त्यानुसार १९३४ पासून या कामाला सुरुवात केली आणि १९३ ७ पर्यंत आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले. [५] १९३ ७ मध्ये जेव्हा ते पुन्हा सुरू झाले त्यावेळी त्याचा कायापालट झालेला होता. [६][७] या हॉटेलच्या इमारतीचा आणि त्याला जोडलेल्या जलतरण तलावाचा आराखडा वास्तुशास्त्रज्ञ जॉफरी बावा यांनी १९ ७४ मध्ये केलेला होता. १९८४ मध्ये ताज समूहाने हे हॉटेल ताब्यात घेतले.

२००८ मध्ये इतिहासकार एस मुथिहाने या हॉटेलविषयी एक पुस्तक – “मद्रासची परंपरा चेन्नई – ताज कॅानेमारा” लिहिले असून , १८८० पासून इंम्पेरीअल या नावाने या हॉटेलची जाहिरात करण्यात आली हेाती. ‘विशाल जागा. . . . . अतिशय थंड आणि सर्व सोयी सुवधिांनी युक्त’ आणि ‘मेसर्स मॅकडोनाल्ड आणि कंपनीकडून मिळालेल्या सुप्रसिद्ध वाईन्स मिळण्याचे ठिकाण’ असे वर्णन या हॉटेलविषयी केलेले आहे. १९३९ पासुन जुन्या मद्रास मधील इमारती, हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आणि हॉटेलच्या आतील परिसर इत्यादींची छायाचित्रे या पुस्तकामध्ये वाचकांना उपलब्ध करून दिलेली आहेत. मुथिहाच्या मते, ब्रिटीशांनी या हॉटेलला जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून नावाजलेले आहे.

सप्टेंबर २०१० मध्ये या हॉटेलला विवान्टा बाय ताज, कॉनेमारा, चेन्नई या नावाने जगप्रसिद्धीस आले.

स्थळ[संपादन]

या हॉटेलमध्ये १५० खोल्या असून १४१ मोठया खोल्या व ९ विशाल कक्ष आहेत. सभा घेण्यासाठी ५ सभागृह असून ४०० लोक एकाच वेळी बसू शकतील असे एक नृत्यगृह आणि ६०० लोक एकाच वेळी पेयपान करु शकतील अशा विशाल सभागृहाची व्यवस्था करून दिलेली आहे. येथील कॉन्फरन्स रुम मध्ये एका वेळी ३० लोकांची बसण्याची सोय केलेली आहे. या हॉटेलमध्ये वरांडा हे २४ तास कॉफीची सोय उपलब्ध असलेले तसेच भारतीय, खंडीय, चीनी आणि थाय अन्नपदार्थ उपलब्ध असलेले रेस्टांरंट आहे. ओकशॉट बारमध्ये विदेशी मदय , स्पिरीटस , वाईन्स , बिअर आणि हलका नाश्ता उपलब्ध आहे. रेनट्री या खुल्या आकाशाखालील रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे खादयपदार्थ दक्षिण भारतीय सांस्कृतिचा वारसा दाखवून देतात. यामध्ये एक्झुक्यूटीव्ह जेवणाची सुध्या स्वतंत्र व्यवस्था आहे.[८]

पुर्नरचना[संपादन]

२००४ मध्ये ताज समूहाने या हॉटेलमधील ६५ खोल्या पुर्नरचित केलेल्या आहेत. [९]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डीलक्‍स – इंडिया हॉटेल्स" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-03. 2014-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "ताज कॉनेमेरा हा आपल्या परंपरेचा नमुना" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-08-28. 2014-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ दयानंद, कतारीआ. "उद्घटन समारंभ" (PDF) (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ फिलिप (जानेवारी २०११), चॅको. "चेन्नईच्या शिरपेचात नवीन तुरा" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2014-10-18. 2014-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ व्हि. (२५ ऑगस्ट २००८), हरीप्रिया. "मूळापर्यंतचा शोध" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2012-03-08. 2014-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ के.आर (५ ऑगस्ट २००६)), सितालक्ष्मी. "चेन्नईच्या इमारतीचा कायापालट" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2008-12-04. 2014-05-17 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "चेन्नईच्या कलात्मक इमारतीचे भविष्य काय?" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "ताज कॉनेमारा हॉटेल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "ताजने कॉनेमाराचो चेहरामोहरा बदलला" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)