तनुजा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तनुजा
जन्म तनुजा मुखर्जी
(पूर्वाश्रमी तनुजा समर्थ)

२३ सप्टेंबर, इ.स. १९४३
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
भाषा हिंदी (अभिनय),
मराठी (मातॄभाषा)
वडील कुमारसेन समर्थ
आई शोभना समर्थ
पती शोमू मुखर्जी
अपत्ये काजोल, तनिशा

तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ, (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत.

थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (इ.स. १९६६), ज्वेल थीफ (इ.स. १९६७), अनुभव (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००८ मध्ये 'रॉक ॲण्ड रोल फॅमिली' या झी टिव्हीवरील रियालिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्यासोबत सह-परिक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

२०१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितॄरूण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भुमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भुमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भुमिकेचे विशेष कौतुक झाले.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.