Jump to content

तत्काळ भरणा सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तत्काळ भरणा सेवा तथा इमिजिएट पेमेंट सर्व्हिस किंवा आयएमपीएस ही एक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तत्काळ पैसे भरता यावेत यासाठी बनवलेली भारतीय सुविधा आहे. ही सेवा वापरून आपल्या मोबाईलवरून छोटी-मोठी रक्कमा दुसऱ्या व्यक्तीस अदा करता येतात.

वर्ष २०१६ मधील पद्धती

[संपादन]
  • आपल्या बँकेचे बँकिंग ॲप भ्रमणध्वनीवर उतरवुन घेतल्यावर बँकेतून मोबाईल बँकिंग चालू करून घ्यावे.
  • यासाठी बँकेतून आपल्याला पिन आणि परवलीचा शब्द मिळतो आणि MMID तयार केला जातो.
  • दुसऱ्या व्यक्तीकडे कोणत्याही बँकेचे मोबाईल बँकिंग चालू केले असेल तर या MMID आणि दूरध्वनीक्रमांकाचा वापर करून पैसे पाठवता येतात.
  • दुसऱ्याकडे मोबाईल बँकिंग चालू नसेल तरी त्याचा खाते क्रमांक & IFS Code वापरून मोबाईल NEFT द्वारे पैसे पाठवता येतात.

उपयोग

[संपादन]

नकद पैशांची चणचण भासत असताना या दोन्ही पद्धती वापरणे सर्वांसाठी सोयीचे आहे. कारण रुपये ५० पासून ५०००० रुपयांपर्यंतचे पेमेंट अवघ्या काही मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून करू शकतो. मोबाईल बँकिंग मधेही मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, कोणालाही छोटे मोठे इन्स्टट फंड ट्रान्सफर वगैरे सगळे आहे. शिवाय पैसे विक्रेत्याच्या थेट बँक अकाउंटला जमा होतात. वैयक्तिक खात्यात आयएमपीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतात, तसेच मोबाईल डीटीएच रिचार्ज आणि फोन वीज क्रेडिट कार्ड इत्यादी बिलांचे पेमेंट याद्वारे करता येते.

इंटरनेट व सुरक्षा

[संपादन]

मात्र यासाठी स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. या व्यवस्था बँकिंग सिस्टीम मधून आल्या आहेत आणि सुरक्षित आहेत. फोन हरवल्यास बँकेत फोन करून नंबर ब्लॉक करता येतो. तसेच पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याची व्यवस्था नसल्याने मोबाईल इतर कोणाच्या हातात पडला तरी तो आपल्या खात्यातून पैसे वापरू शकणार नाही.adrdgb

शुल्क

[संपादन]

या व्यवस्थेसाठी काही बँकात कोणतेही चार्जेस नाहीत मात्र आपल्या बँकेत चार्जेस आहेत का आणि असल्यास किती आहेत याची खात्री त्या त्या बँकेच्या वेबसाईट किंवा हेल्पलाईन वरून करून घ्यावी.

हे ही पाहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]