ढोकरी
ढोकरी या पक्षास इंग्रजी भाषे मध्ये Indian Pond Heron आणि Paddybird असे म्हणतात.ढोकरी या पक्ष्याचे नर व मादी म्हणजेच स्त्री व पुरुष असे दोन भाग पडतात त्या पैकी स्त्री लिंगास मराठी मध्ये कबोडी,कुबढी ढोकरी,खैरी ढोकरी,ढोकरी,भंडारा भागात देवढोकरी म्हणतात तर पुरुष लिंगास कोका,पिवळा कोक मिला,बग लोणचा,मिळ,मिळा,मिळोख, पण बगळा,वंचक बक,वंचक बगळा तर ठाणे येथे लोण बगळा,नाशिक येथे पण ढोसला,पुणे येथे पिसाळ बगळा,गोवामध्ये बके ,मेळघाट अमरावती येथे कीटकीर,भंडारा भागात टोकरी ढोकी,धमनी ढोकी,माडिया गडचिरोली येथे त्यास गुटी कोंगा असे म्हणतात. तर हिंदी भाषेमध्ये त्यास अन्धा बगला,चामा बगला,खुंच बगला,बगला,बोगली,इ.म्हणतात
तसेच संस्कृत मध्ये त्यास अन्धकाक,अन्धबक,कोयष्टि,भारत अन्ध बक,स्वल्पकड्.क असे म्हणतात.
गुजराती भाषेमध्ये त्यास काणी बगली तर तेलुगू मध्ये गुड्डी कोंग,गुड्डी कोक्कराइ तर कन्नड मध्ये कोलद बक,अंध बक,काब्बार कोळद कंक बक,कंक,लोह्पृष्ठ,हरटेहक्कि तसेच तमिळमध्ये कुरुट्टु कोक्कु,कोलातु कोक्कु,मडै काटान,मडयान असे म्हणतात
.
या पक्षास ओळखणे खुपच सोप्प नाहीए कारण नर व मादी दोघेही दिसायला म्हणजेच रंग,रूप,आकार,इ.बाबतीत सारखेच असतात.हा पक्षी कोंबडीपेक्षा मोठा आणि लहान असतो तर बगळ्यासारखा दिसणारा पाणपक्षी.बसलेला असला की,मतट उदी दिसतो.उडू लागला की,पंख पांढरे दिसू लागतात.विणीच्या काळात त्याच्या पाठीवर किरमिजी रंगाची केसांसारखी सुबक पिसे दिसतात.डोक्यावर लांब पांढरा तुरा येतो.
हा पक्षी जास्तीत-जास्त भारत,श्रीलंका,अंदमान आणि निकोबार बेटांत आढळतो.तो आपले स्थानिक स्थलांतर करत असतो साधारणतः हा पक्षी भारतामध्ये मे ते सप्टेंबर या काळात आढळतो.
याचे निवासस्थान म्हणजे तळी,दलदलीची जागा,भातशेते आणि खजणीची जंगले आहेत.
संदर्भ
[संपादन]पुस्तकाचे नाव:पक्षीकोश लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली