Jump to content

डोळे भरून शेंडे कलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डोळे भरून शेंडेकलम (TOP WORKING) हे जुन्या मोठ्या झाडांचे चांगल्या जातिवंत झाडात रूपांतर करण्यासाठीची शेंडे कलम पद्धती आहे. प्रथम मोठ्या झाडाच्या वरच्या फांद्या एका विशिष्ट उंचीवर छाटतात. छाटलेल्या फांद्याना नंतर जोरदार धूमारे फुटतात. या धुमाऱ्यावर आपल्याला हव्या त्या जातीचे डोळे भरतात. अशा रीतीने झाडाचा वरचा सर्व शेंडा नवीन जातीत रूपांतरित करतात. हे डोळे भरताना नवे धूमारे रसदार असावेत म्हणजे त्यांच्यावर भरलेले डोळे जगतील. आंब्याच्या बाबतीत अशा पद्धतीने रायवळ आंब्याचे नामाकींत आंब्यात रूपांतर करता येईल.।