मंदा खांडगे
Appearance
(डॉ. मंदा खांडगे या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉ. मंदा खांडगे (१७ मे, इ.स. १९४६ - ) या एक मराठी लेखिका, कवी, बालसाहित्यकार आणि संपादिका आहेत. त्यांची सुमारे ५० पुस्तके प्रकाशित झाली असून ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ या चार खंडी पुस्तकाच्या प्रमुख संपादिका आणि ‘भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’ ह्या दोन-खंडी ग्रंथाच्या प्रकल्पप्रमुख आहेत.
साहित्यप्रेमी या दिवाळी अंकाच्या त्या संपादक आहेत.
प्रकाशित पुस्तके
[संपादन]- एक झोका (ललित)
- एकांडा (बालसाहित्य)
- कवीच्या गावा जावे (केशवसुत ते मर्ढेकर या कवींचा आणि त्यांच्या साहित्याचा परिचय)
- गस्तवाल्यांची गीते आणि निवडक कविता (ग.ह. पाटील यांच्या कवितांचा संग्रह, संपादन)
- चिचू (बालसाहित्य)
- ज्योतिर्मयी (व्यक्तिचित्रण, बालसाहित्य)
- डिंगोरी (कवितासंग्रह)
- पहाडबाबा (कथासंग्रह)
- पक्षी-मित्र (बालसाहित्य)
- पाऊलखुणा रुपेरी दुनियेच्या (कादंबरी?)
- पुण्यातील संग्रहालये(माहितीपर)
- प्रबंध - एकादशी (माहितीपर, संपादन)
- भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा (दोन खंड)
- मॉली (बालसाहित्य)
- मित्रप्रेम (बालसाहित्य)
- मी गुंड्याभाऊ (बाळ कर्वे : शब्दांकन मंदा खांडगे)
- विचारधन (लेखक भालचंद्र फडके, संपादन मंदा खांडगे)
- Women's Literature in India (दोन खंड, सहलेखक निशिकांत मिरजकर, वगैरे))
- वैभव पेशवेकालीन वाड्यांचे (ऐतिहासिक)
- वृक्षमित्र (बालसाहित्य)
- व्यक्तिरंग (ललित)
- सोनफुलं (निसर्गविषयक)
- स्त्री साहित्याचा मागोवा (४ खंड)
- हिरवे जग (बालसाहित्य)