प्रवीण बढे
डॉ. प्रवीण बढे हे महाराष्ट्रातील आयुर्वेद आणि निसर्गोपचार तज्ज्ञ असून ते आयुर्वेदच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉ. बढे यांनी अनेक रुग्णांवर विविध आजारांसाठी यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. प्रवीण बढे हे प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरीटी फाउंडेशन या धर्मादाय संस्थेचे संस्थापक आहे.[१][२]
डॉ. प्रवीण बढे | |
---|---|
Dr. Pravin Badhe | |
जन्म |
१ जून, १९८१ राजापूर, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | आयुर्वेदाचार्य |
पेशा | निसर्गोपचार तज्ज्ञ |
मालक | प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरीटी फाउंडेशन |
वडील | भास्कर बढे |
संकेतस्थळ https://pristinecharity.org/ |
जीवन
[संपादन]प्रवीण बढे यांचा जन्म १ जून १९८१ रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर या गावात झाला.[३] प्रवीण बढे हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी आयुर्वेदातली पदवी मिळवली आहे. मागील ११ वर्षांपासून प्रवीण बढे हे आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहे.[ संदर्भ हवा ]
शैक्षणिक पात्रता
[संपादन]प्रवीण बढे यांनी २०१६ या वर्षी निसर्गोपचार क्षेत्रात एम.डी. पदवी व २०१८ या वर्षी पी.एच.डी. पदवी प्राप्त केली.[ संदर्भ हवा ]
प्रकाशन
[संपादन]- आयुर्वेद चाणक्य: जुलै २०२४ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक आयुर्वेद विषयावर आधारित आहे.[४]
पुरस्कार
[संपादन]- न्यूज १८ लोकमत चा उद्योगरत्न पुरस्कार: हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
- वाग्धारा सम्मान: महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आयुर्वेदातील महत्वपूर्ण कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[३]
- उद्धवश्री पुरस्कार: जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आयुर्वेद क्षेत्रात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[५]
सामाजिक कार्य
[संपादन]प्रिस्टाईन आयुर इंडिया चॅरीटी फाउंडेशन या संस्थेचे डॉ. प्रवीण बढे हे संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे आणि सामाजिक कार्य केली आहेत.
- जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथे आरोग्य शिबीर[६]
- काशीग येथे आरोग्य शिबीर आणि पुस्तक वाटप[७]
- वारूळवाडी येथे जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे शरीर तपासणी [८]
- पिंपळे सौदागर येथे नागरिकांची आरोग्य तपासणी[२]
- मदनवादी येथे आरोग्य तपासणी [९]
- आरोग्य शिबीर आणि तपासणी मावळ [१०]
संदर्भ
[संपादन]- ^ "Pristine Ayur India Charity Foundation" (इंग्रजी भाषेत). 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ a b CD (2024-07-28). "साडेचारशे नागरिकांची तपासणी". Marathi News Esakal. 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ a b "आयुर्वेद के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य के लिए डॉक्टर प्रवीण बढ़े को राज्यपाल ने किया सम्मानित". punjabkesari. 2024-07-24. 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ ayurved chankya. Pune: paris publication. 2024. ISBN 978-81-974319-1-3.
- ^ चौगुले, अमृता (2023-09-03). "पिंपरी : पुरस्कार सोहळ्यामुळे मान्यवरांचे दर्शन घडते". Pudhari News. 2024-08-02 रोजी पाहिले.
- ^ Shaikh, Anaum (2024). "Pune: Community collaboration enhances rural healthcare". Pune: Pune Mirror.
- ^ CD (2024-02-20). "काशीग येथे आरोग्य शिबिर, पुस्तक वाटप". Marathi News Esakal. 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ CD (2023-02-06). "वारुळवाडी जर्मन टेक्नॉलॉजी मशिनद्वारे २५५ जणांची मोफत शरीर तपासणी". Marathi News Esakal. 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ CD (2022-02-20). "मदनवाडी येथे शिबीरात १५३ जणांची आरोग्य तपासणी". Marathi News Esakal. 2024-07-31 रोजी पाहिले.
- ^ "Rotary 3131". rcpimprielite.rotary3131.org. 2024-07-31 रोजी पाहिले.