डॉज बॉल
डॉज बॉल हा एक मैदानी खेळ आहे. या खेळात फूटबॉलचा चेंडू वापरला जातो.
क्रीडांगण
[संपादन]- ३६० मीटर त्रिज्येचे वर्तुळ.
खेळाचे स्वरूप व नियम
[संपादन]दोन्ही संघाचे प्रत्येकी ११ खेळाडू असतात - यांपैकी ९ खेळाडू प्रत्यक्ष सामन्यात उतरवले जातात, तर २ खेळाडू राखीव असतात.
डॉज बॉल सामन्यात प्रत्येकी ५ मिनिटांचे ४ डाव असतात. दोन डावांच्या मध्ये ५ मिनीटांची विश्रांती असते. नाणेफेक जिंकणारा संघ आक्रमण किंवा संरक्षण याची निवड करतो. आक्रमण करणारे खेळाडू वर्तुळाच्या कडेवर समान अंतरावर उभे असतात. संरक्षक संघातील ३ खेळाडू मैदानात येतात. खेळ सुरू झाल्याबरोबर आक्रमण करणारे खेळाडू संरक्षक खेळाडूस चेंडूने मारण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रयत्नात चेंडू जमिनीस न लागता सरळ संरक्षक खेळाडूच्या गुडघ्याच्या वर लागल्यास संरक्षक खेळाडू बाद होतो. ३-३ च्या गटाने संरक्षक खेळाडू खेळतात. प्रत्येक बाद खेळाडूमागे आक्रमक संघास १ गुण मिळतो. प्रत्येक संघ दोन वेळा आक्रमण व दोन वेळा संरक्षण करतो. सर्वाधिक गुण मिळविणारा संघ सामन्यात विजयी ठरतो.