डिलीरियम ट्रेमन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डिलीरियम ट्रेमन्स

डिलीरियम ट्रेमन्स (delirium tremens) एक मानसिक तसेच शारीरिक रोग आहे. रोज मद्य सेवणाऱ्या व्यक्तीला अकस्मात मद्य घेता आले नाही तर जी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, याला डिलीरियम ट्रेमन्स म्हणतात. डिलीरियम ट्रेमन्समुळे जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. रुग्ण कमालीचा अस्वस्थ होतो, विविध त्रास होऊ लागतात, निद्रानाश होतो, सर्व अंगाला घाम सुटू लागतो आणि मन खिन्न होते. डिलीरियम ट्रेमन्स होण्यापूर्वी नाडीची गती जलद होते. ताप येऊ लागतो. काहींना एकामागून एक फिटस्‌ येऊ लागतात (Status epilepticus). हृदयाचे ठोके अनियमितपणे पडू लागतात आणि रक्तदाब झपाट्याने उतरू लागतो. हा आजार मद्यपींपैकी १० टक्के व्यक्तींना होऊ शकतो.