Jump to content

ठिगळडोळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ठिगळडोळा हा झाडावरील डोळा भरण्याचा प्रकार तत्त्वत: शील्ड -पद्धतीने डोळा भरण्यासारखाच आहे. यात डोळा काढून घेण्याचा प्रकार आणि डोळ्याचा आकार या बाबीपुरता फरक आहे. या प्रकारच्या डोळा भरण्याच्या पद्धतीत डोळ्याच्या समवेत काढलेली साल चोकोनीआकाराची असते. आणि खुंटावर ज्या ठिकाणी हा डोळा बसवावयाचा असतो. त्याची सालसुद्धा त्याच आकाराची व मापाची काढून घ्यावी लागते. खुंटावरच्या त्या जागेवर हे डोळ्याचे ठिगळ (Patch) नीट घट्ट बसवून काळजीपूर्वक बांधून घ्यावे लागते. शील्ड -पद्धतीने डोळा भरण्यापेक्षा ही पद्धत उशीरा डोळा फुटणारी व करावयास कठीण अशी आहे. ज्या झाडाच्या साली जाड असतात अशांच्या अभिवृद्धीकरता ह्या पद्धतीचा वापर करतात. युरोपात वॉलनट व पेकन या झाडांच्या अभिवृद्धीकरता या पद्धतीचा वापर करतात.आपल्याकडे याच पद्धतीत थोडा फरक करून एकेकाळी आंब्यात ही पद्धत वापरली जात होती.