Jump to content

टोनी ताकीतानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोनी ताकीतानी
दिग्दर्शन जून इचिकावा
कथा हारूकी मुराकामी
पटकथा जून इचिकावा
संगीत रुईची सकामोटो
देश जपान
भाषा जपानी
प्रदर्शित २९ जानेवारी २००५
अवधी ७५ मिनिटे

टोनी ताकीतानी (जपानी: トニー滝谷 ;) हा इ.स. २००५ साली पडद्यांवर झलकलेला जपानी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट हारूकी मुराकामी यांच्या लघुकथेवर आधारला असून जून इचिकावा यांनी दिग्दर्शिला आहे.

कथानक

[संपादन]

हा चित्रपट कथानायक टोनी (इस्सेई ओगाता), त्याचे वडील शोझाबुरो ताकीतानी यांच्या भोवती फिरतो. त्यांच्या आयुष्यात स्त्रिया, मित्र येऊनही एकांतवास अजेय आहे आहे अशी हृदयद्रावक कथा लेखक आणि दिग्दर्शकाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपट शैली

[संपादन]

जून इचिकावा यांनी छायांकनातून नवीन शैली निर्माण केली आहे. जेव्हा एक दृश्य संपते तेव्हा दुसरे दृश्य सुरू होण्या आधी पुस्तक उलटण्याचा स्पर्श दिग्दर्शकाने दिला आहे. त्यामुळे हारूकी मुराकामी यांच्या मूळ कथेशी चित्रपट एकरूप झाल्याचे जाणवतो.

संगीतमुद्रिका

[संपादन]

रुईची सकामोटो यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. संगीत पूर्णपणे पियानोवर देण्यात आले आहे.

संगीत रचनाची यादी :

संगीत रचनेचे नावसंगीत वेळ
१. "DNA - Intro"(डी.एन.ए -सुरुवात)११ :३७
२. "Solitude"(सोलीटूद)४:५५
3. "DNA"(डी.एन.ए)६:२८
४. "Bottom" (बोटोम)०:४०
५. "Fotografia #1"(फोटोग्राफिया #१ )३:३३
६. "Fotografia #2"(फोटोग्राफिया #२)३:४२
७. "Solitude #2"(सोलीटूद #२)२:३४
८. "Harmonics #1"(हर्मोनिक्स#१)०:५१
९. "Solitude - One Note"(सोलीटूद-वन नोट )३:२५
१०. "Harmonics #2"(हर्मोनिक्स#२१:०२
११. "Solitude - Theme"(सोलीटूद-थीम)४:००

भूमिका

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]