Jump to content

टेक्सास गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टेक्सास गायकवाड
जन्म कुंभारवळण, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
शिक्षण बी. कॉम.; एल एल बी
प्रमुख नाटके आम्ही देशाचे मारेकरी
प्रमुख चित्रपट सुख की दौलत
वडील भाऊसाहेब गायकवाड

टेक्सास भाऊसाहेब गायकवाड (जन्म १९४८) हे प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, लेखक, कलावंत आहेत. आम्ही देशाचे मारेकरी[] हे त्यांचे गाजलेले नाटक. हिंदी व मराठी रंगभूमीवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. सुख की दौलत[] हा हिंदी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती[].

कार्य

[संपादन]

टेक्सास गायकवाड यांनी कार्यकर्ता कलावंत म्हणून दलित रंगभूमी आणि प्रबुद्ध रंगभूमीस भरीव योगदान दिलेले आहे[]. प्रबोधनात्मक नाट्य निर्मिती करून त्यांनी समाजात समता, स्वातंत्र्य व भ्रातृभाव ही संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला..


नाटके

[संपादन]
  1. ॲट्रॉसिटी
  2. आम्ही देशाचे मारेकरी
  3. जळवा
  4. प्रबुद्ध जलसे (नवा इतिहास)
  5. ब्रह्महत्या
  6. मन्वंतर
  7. मानदंड
  8. माफीनायक
  9. रंग आंधळे
  10. सूर्योदय

दिग्दर्शित नाटके

[संपादन]

आखरी जाम (उर्दू), काळोखाच्या गर्भात, घाशीराम कोतवाल (हिंदी), थॅंक्यू मि. ग्लाड (हिंदी), नटसम्राट (मराठी), फेअरवेल टू बॅबिलोन (सहदिग्दर्शन, इंग्लिश- द आफ्रिकन थिएटर ग्रुप सोबत केलेले), मनुकलंक (खैरलांजी हत्याकांडावर आधारित नाट्य.)


  1. ^ "मराठी विश्वकोश : खंड १४". marathivishwakosh.maharashtra.gov.in. 2019-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Texas Gaikwad". IMDb. 2019-04-09 रोजी पाहिले.
  3. ^ "मावळ लोकसभेच्या रिंगणात बसपाकडून टेक्सास गायकवाड प्रतिनिधी, पिंपरी". Loksatta. 2019-04-09 रोजी पाहिले.
  4. ^ Kamble, Mahavir Vithal (2009-6). "Sathottari Marathi natak ani dalit natak: ek chikitsak abhyas". INFLIBNET (Marathi भाषेत). |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)