Jump to content

तुपोलेव टीयू-१५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टी.यू.१५४ या पानावरून पुनर्निर्देशित)
तुपोलेव टीयू-१५४

मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे उझबेकिस्तान एअरवेजचे तुपोलेव तू-१५४एम विमान

प्रकार मध्यम पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे जेट विमान
उत्पादक देश सोव्हिएत संघ/रशिया
उत्पादक तुपोलेव
पहिले उड्डाण ८ ऑक्टोबर १९६८
समावेश ७ फेब्रुवारी १९७२ (एरोफ्लोत)
सद्यस्थिती मर्यादित सेवेत
मुख्य उपभोक्ता रशियन हवाई दल
उत्पादन काळ १९६८-२०१३
उत्पादित संख्या १,०२६
Tu-154

तुपोलेव टीयू-१५४ (रशियन: Туполев Ту-154) हे रशियाच्या तुपोलेव कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे जेट विमान आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६० च्या दशकात विकसित करण्यात आले. सोव्हिएत संघ काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे एरोफ्लोत ह्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग ९७५ किमी प्रति तास (६०६ मैल/तास) इतका तर क्षमता ५,२८० किलोमीटर (३,२८० मैल) इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे.

२०१० मध्ये एरोफ्लोतने तुपोलेव तू-१५४ विमाने आपल्या ताफ्यातून निवृत्त करण्याची घोषणा केली. तुपोलेव तू-१५४ विमानाचा अखेरचा प्रवास ३१ डिसेंबर २००९ रोजी येकातेरिनबुर्ग ते मॉस्को ह्या एरोफ्लोत फ्लाईट ७३६ द्वारे घडला.

तपशील

[संपादन]
मोजमाप टीयू-१५४बी-2 टीयू-१५४एम
वैमानिक ३/४
आसनक्षमता 114–180
लांबी ४८.० मीटर (१५७ फूट ६ इंच)
पंखंमधील अंतर ३७.५५ मीटर (१२३ फूट २ इंच)
पंखांचे क्षेत्रफळ २०१.५ चौरस मीटर (२,१६९ चौ. फूट)
उंची ११.४ मीटर (३७ फूट ५ इंच)
कमाल वजनक्षमता ९८,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) – १,००,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) १,०२,००० किलोग्रॅम (२,२०,००० पौंड) – १,०४,००० किलोग्रॅम (२,३०,००० पौंड)
रिकामे वजन ५०,७०० किलोग्रॅम (१,१२,००० पौंड) ५५,३०० किलोग्रॅम (१,२२,००० पौंड)
कमाल वेग 975 km/h (606 kn)
कमाल वजनावरील अंतरक्षमता २,५०० किमी (१,३०० nmi; १,६०० मैल) ५,२८० किमी (२,८५० nmi; ३,२८० मैल)
कमाल इंधनावरील अंतरक्षमता ३,९०० किमी (२,१०० nmi; २,४०० मैल) ६,६०० किमी (३,६०० nmi; ४,१०० मैल)
उडण्याची सर्वाधिक उंची १२,१०० मीटर (३९,७०० फूट)
इंजिन (x 3) कुझनेत्सोव NK-8-2U सोलोविव D-30KU-154
कमाल दाब (x 3) 90 kN (20,000 lbf) each[] 103 kN (23,148 lbf) each[]
कमाल इंधन क्षमता ४७,००० लीटर (१०,००० imp gal; १२,००० US gal) ४९,७०० लीटर (१०,९०० imp gal; १३,१०० US gal)

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b Originally measured as 10,500 kgf.