Jump to content

टिकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिकली हा एक सौंदर्यालंकार आहे. हा अलंकार स्त्रिया आपल्या कपाळावर लावतात . टिकल्या अनेक आकाराच्या असतात. गोल,अंडाकार,चंद्रकोर या आकाराच्या असतात, त्याचप्रमाणे टिकल्या अनेक रंगाच्या असतात. कुंकू हे हिंदू स्त्रिया वापरत असलेला सौभाग्यालंकार आहे. सहसा विवाहित स्त्रिया कुंकू कपाळावर लावतात.

इतिहास

[संपादन]

कथासरित्सागात वासवदत्ता व पद्मावती यांच्या कथेत टिकलीचा उल्लेख आहे.प्रसाधनासाठी झाडाच्या पानाचाही टीकल्या म्हणून उपयोग करीत असल्याचा उल्लेख आढळतात. यस्यामुपवनवीत्या तमालपत्राणि युवतिवदने च अर्थ – (वाराणसीतल्या) उपवनमार्गावरील तमालवृक्षांवर व युवतीच्या मुखांवर तमालपत्रे सोबत असत. टिकली लावण्याची पद्धत मुखत्वे उत्तर प्रदेश,राजस्थान व मारवाड या भागात आहे.दक्षिणेत टिकली फारशी प्रचारात नाही. कुमारी व सौभाग्यवती यांचाच हा अलंकार आहे.जबलपूर,बेतुल,रायपूर आणि सागर या जिल्ह्यातील लाखेरा आणि पटला जातीचे लोक टिकल्या तयार करण्याचा व्यवसाय करतात.[]

स्वरूप

[संपादन]

टीका (तिलक) या शब्दावरून हा लघुत्यदर्शक शब्द बनला आहे.टिकली गोल असते. क्वचितच ती ताराकृती,स्वस्तिकाकृती व अर्धचंद्राकृती अशीही करतात.तिचा खालचा भाग गुलालाचा किवा कुंकवाचा असतो.आणि वरचा भाग भिंगाचा किवा अभ्रकाचा असतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा