टास्क फोर्स १७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टास्क फोर्स १७ किंवा टॅफी १७ हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान रचण्यात आलेला अमेरिकेच्या आरमारातील विमानवाहू नौका व इतर लढाऊ जहाजांचा तांडा होता.

सुरुवातीस हा तांडा यु.एस.एस. यॉर्कटाउन या विवानौकेला ध्वजनौका करून रचला गेला. या ताफ्याने जपानच्या शाही आरमाराशी मार्शल-गिल्बर्ट धाडी, ले-सलामौआवरील आक्रमण, कॉरल समुद्राची लढाई तसेच मिडवेची लढाई या महत्त्वाच्या लढायांमध्ये झुंज घेतली. मिडवेच्या लढाईत यॉर्कटाउनला शत्रूने जलसमाधी दिली.

यानंतर यु.एस.एस. हॉर्नेटला टॅफी १७ची ध्वजनौका करण्यात आले. या नवी तांड्याने ग्वादालकॅनालच्या लढाईतसांता क्रुझ द्वीपसमूहाच्या लढाईत भाग घेतला, ज्यात हॉर्नेटचा अंत झाला. यानंतर टॅफी १७ बरखास्त करण्यात आला.