टार्टन दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टार्टन दिन हा कॅनडा आणि अमेरिकेत पूर्वी स्थलांतरित झालेल्या स्कॉटलंडच्या नागरिकांकडून दरवर्षी एप्रिल ६ रोजी साजरा करण्यात येणारा एक दिवस आहे. या दिवशी १३२० साली आर्बोआथचा तह संमत झाला होता.

हा उत्सव १९८०च्या दशकात कॅनडात सुरू झाला आणि नंतर कॅनडातील इतर शहरांतून तसेच अमेरिकेत पसरला.[१]

ऑस्ट्रेलियामध्ये टार्टन दिन १ जुलै रोजी साजरा केला जातो. १७४७मध्ये या दिवशी अॅक्ट ऑफ प्रोस्क्रिप्शन या कायद्यातहत टार्टन घालण्यावरील बंदी उठविण्यात आली होती.

टार्टन दिनाला पाइप बँड आणि हायलँड नाचांस सह मिरवणूका निघतात तसेच इतर स्कॉटलंडकेंद्री कार्यक्रम आयोजित केले जातात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "इव्हेंट्स - टार्टन डे इन कॅनडा (एप्रिल ६)" (इंग्लि मजकूर). फेडरेशन ऑफ स्कॉटिश क्लॅन्स इन नोव्हा स्कॉशिया. २००७. २००९-०५-१५ रोजी पाहिले.