टकाचोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी नाव[संपादन]

टकाचोर, भेरा, महालत हा भारतात आढळणारा एक पक्षी आहे.

इंग्रजी नाव[संपादन]

TREE PIE

शास्त्रीय नाव[संपादन]

Dentrocitta vagabunda

टकाचोर
Rufous tree pie.jpg

माहिती[संपादन]

ह्या पक्ष्याचे आकारमान ५० सेंमी एवढे असते. कावळ्याच्या कुटुंबातील हा सुंदर पक्षी पानझडीच्या जंगलात तसेच विरळ झाडोरा असलेल्या प्रदेशात आढळतो. कावळ्याप्रमाणेच फळ,किडे,सरडे,पाली,बेडूक सगळेच खातो.टकाचोर चार पाच जणांच्या थव्याने राहतात आणि खाद्य शोधतात.या पक्ष्याला शास्त्रीय नावातील दुसऱ्या शब्दाचा अर्थ उडाणटप्पू ,भटक्या किंवा कलंदर असा आहे. टकाचोर या बंगालीतून मराठीत आलेल्या नावाचा अर्थ रुपयाची नाणी चोरणारा असा होतो. लांबलचक शेपूट असलेल्या टकाचोर चेस्टनट तपकिरी रंगाचा पक्षी असून त्याचे डोके आणि मान काजळी काळ्या रंगाची असते.जंगलातील मनुष्यवस्त्यांवर हे पक्षी इतके माणसाळतात की हातातले खाण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. टकाचोर इतर लहान सहान पक्ष्यांची अंडी आणि पिल्लेही फस्त करतो.जंगलातला लांब शेपटीचा कावळा असे याचे वर्णन करता येईल. हा पक्षी जंगलात कावळ्याची भूमिका बजावतो. एखादा प्राणी मेला असेल किंवा वाघासारख्या प्राण्याने शिकार केली असेल अशा ठिकाणी टकाचोर हमखास जातो व आपला वाटा वसूल करतो. अभयारण्यामध्ये किंवा राष्ट्रीय उद्यानामध्ये टकाचोरचा कॅक कॅक असा आवाज येतो. असा भसाडा आवाज आला की वाघ किंवा बिबट्या दिसण्याची शक्यता असते. असे शिकारी प्राणी दिसले रे दिसले की टकाचोर विशिष्ट आवाज काढून जंगलभर धोक्याची सूचना देतो.

संदर्भ[संपादन]

दोस्ती करू या पक्ष्यांशी (पुस्तक)