ज्यूलिअस फ्यूशिक
Appearance
ज्यूलिअस फ्यूशिक (चेक : Julius Fučík) (२३ फेब्रुवारी १९०३ – ८ सप्टेंबर १९४३) हे एक चेकोस्लोव्हाकियन पत्रकार होते. ते चेकोस्लोव्हाकियाच्या कम्युनिस्ट पार्टीचे सक्रिय सदस्य होते, व नाझी-विरोधी आघाडीचा भाग होते. नाझींनी त्यांना तुरुंगात डांबून त्यांचा छळ केला व मग त्यांची हत्या केली.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]ज्यूलिअस फ्यूशिक यांचा जन्म प्रागमधील एका कामगारवर्गीय घरात झाला. त्यांचे वडील पोलाद कामगार होते. १९१३ साली त्यांचा परिवार प्रागपासून पिल्झेन येथे स्थलांतरित झाला. ज्यूलिअस १२ वर्षांचे असताना त्यांनी "स्लोव्हान" नामक वृत्तपत्र सुरू करण्याचे ठरवले होते. राजकारण व साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांना रस होता. किशोरवयात असताना ते बरेचदा स्थानिक हौशी थिएटरमध्ये अभिनय करायचे.