Jump to content

ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[]अनेक व्यक्ति मिळून समाज घडत असतो. ज्यामुळे व्यक्ति आणि समाजधारणा होते तो धर्म होय.व्यक्ति आणि समाज यांना जोडणारे अनेक संस्कार हिंदू धर्मात आहेत. त्यातील विवाहसंस्कार हा एक प्रमुख संस्कार आहे. आपले सारेच संस्कार हे संस्कृत भाषेत आहेत. पण संस्कृत मधील संस्कार हे सर्वांपर्यंत पोचतात असे नाही. मग हे सारे संस्कार अर्थपूर्ण पद्धतीने व्हावेत म्हणून ज्ञान प्रबोधिनीने धर्म निर्णय मंडळाच्या विव्दजनांनी तयार केलेल्या पोथीवरून विवाह संस्काराची पोथी तयार केली आहे. विवाह संस्कारातील सर्व विधींचा अर्थ वधू वरां सह, जे ह्या संस्कारासाठी उपस्थित आहेत, त्या सर्वांना हा संस्कार नीटपणे समजावा हा यातील महत्त्वाचा भाग आहे. प्रचलित विवाह संस्कारापेक्षा ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने केला जाणारा हा संस्कार वेगळा आहे. सार्थता, सामुहिकता, शिस्त आणि समभाव ह्या चतुःसूत्रीवर सोळा संस्कार संपन्न केले जातात. कालोचित आणि अर्थवाही संस्कार हे ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कारांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. संकल्प , गणपतीपूजन, कुलदेवतापूजन, पुण्याहवाचन, मंगलसूत्रबंधन, ह्यानंतर कन्यादान हा विधी केला जातो. कन्यादानाला पर्याय म्हणून स्वयंवर हा विधी सुचवला आहे. अक्षतारोपण, नियमबन्ध, पाणिग्रहण, अग्निप्रदीपन, लाजाहोम, प्रधानहोम, अश्मारोहण, सप्तपदी आणि वधू वरांवर अभिषेक हे विधी केले जातात आणि शेव़टी मंगलाष्टका म्हटल्या जातात. पारंपरिक विवाह पद्धतीत ग्रहमख, सीमांतपूजन, झाल देणे, सुनमुख, कंकणबंधन हे विधी केले जातात. वराचा कान पिळणे, किंवा वधूवरांनी एकमेकांना घास भरवणे हे लौकिक विधी करण्यासही काही प्रत्यवाय नाही अशी प्रबोधिनीची भूूमिका आहे. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने केले जाणारे संस्कार हे मराठी. हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषांमध्ये केले जातात. देशात आणि परदेशात देखील ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने संस्कार केले जातात.

  1. ^ ज्ञान प्रबोधिनी संस्कार माला. पुणे: ज्ञान प्रबोधिनी. 2 मार्च 2016. p. 3. |first= missing |last= (सहाय्य)