जोंगखा विकास आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोंगखा विकास आयोग
རྫོང་ཁ་གོང་འཕེལ་ལྷན་ཚོགས
कावाजांगत्सा येथे जोंगखा विकास आयोगावाचे कार्यालय, थिंफू
लघुरूप डी. डी. सी.
स्थापना १९६८
संस्थापक जिग्मे सिंग्ये वांग्चुक
प्रकार भाषा नियामक
मुख्यालय थिंफू, भूतान
अधिकृत भाषा
जोंगखा भाषा
संकेतस्थळ www.dzongkha.gov.bt

जोंगखा विकास आयोग (རྫོང་ ཁ་ གོང་ འཕེལ་ ལྷན་ ཚོགས) जोंगखा भाषे संबंधित बाबींवर अग्रगण्य संस्था आहे. भूतानची राष्ट्रभाषा म्हणून जोंगखाच्या वापराचे जतन व संवर्धन करण्यासाठी भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक यांनी १९८६ मध्ये या आयोगाची अधिकृतरित्या स्थापना केली होती.या आयोगाचे कार्यालये आता भूतान राष्ट्रीय वाचनालय आणि शिक्षण मंत्रालय जवळ, थिंफू मधील कावाजांगत्सा भागात स्थित आहेत.

जोंगखा विकास आयोगाचे दोन भाग आहेत: भूटानच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नऊ प्रख्यात सदस्य (किंवा आयुक्त) असलेले आयोग; आणि आयोग सचिवालय जे आयोगाचे दैनंदिन काम करतात.

भाषेवर अधिकृत प्राधिकरण म्हणून काम करण्याचे मुख्य कार्य या आयोगाकडे असते. जोंगखाच्या वापरास प्रोत्साहन देणे; भाषेचे अधिकृत शब्दकोश आणि व्याकरण संशोधन आणि प्रकाशित करणे; नवीन शब्दावली विकसित करणे; आणि भाषेचे समर्थन करण्यासाठी सॉफ्टवेर आणि फॉन्ट विकसित करणे या आयोगाच्या जवाबदाऱ्या आहेत.

बाह्य दुवे[संपादन]