जॉश ब्रोलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉश ब्रोलिन

जोश जेम्स ब्रोलिन [१] (१२ फेब्रुवारी १९६८) [२] हा एक अमेरिकन अभिनेता आहे. अभिनेता जेम्स ब्रोलिनचा मुलगा असलेल्या जोशने तरुणपणात द गुनीज (१९८५) या साहसी चित्रपटातील भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली. अनेक वर्षांच्या घसरणीनंतर नो कंट्री फॉर ओल्ड मेन (२००७) या गुन्हेगारी चित्रपटातील मुख्य भूमिकेने ब्रोलिनचे पुनरुत्थान झाले. ब्रोलिनला चरित्रपट मिल्क (२००८) मध्ये डॅन व्हाईटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये थॅनोसच्या भूमिकेने ब्रोलिनला व्यापक मान्यता मिळाली, ज्यामध्ये अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८) आणि अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) या चित्रपटांचा, तसेच डेडपूल २(२०१८) मधील केबलच्या भूमिकेचा समावेश आहे. डब्ल्यू. (२००८), हेक्स (२०१०), ट्रू ग्रिट (२०१०), वॉल स्ट्रीट: मनी नेव्हर स्लीप्स (२०१०), मेन इन ब्लॅक ३ (२०१२), ओल्डबॉय (२०१३), इनहेरंट वाइस (२०१४), एव्हरेस्ट (२०१५), सिकारियो (२०१५), हेल, सीझर! (२०१६), ओन्ली द ब्रेव्ह (२०१७), आणि ड्यून (२०२१) हे त्याचे इतर उल्लेखनीय चित्रपट आहेत. [३] २०२२ मध्ये ब्रोलिनने अलौकिक रहस्य मालिका आउटर रेंज मध्ये काम केले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Sign In". FamilySearch. Archived from the original on May 17, 2022. June 8, 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Screen World 2003, By John Willis, Barry Monush. Published by Hal Leonard Corporation, 2004. आयएसबीएन 1-55783-528-4, आयएसबीएन 978-1-55783-528-4
  3. ^ Elliott, Warren (April 13, 2022). "Josh Brolin Confirms His Dune 2 Return With Funny IMDb Story". ScreenRant (इंग्रजी भाषेत). Archived from the original on July 15, 2022. July 15, 2022 रोजी पाहिले.