Jump to content

जॉर्ज मायकेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉर्ज मायकल या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉर्ज मायकेल (जन्मनाव जॉर्जिओस किरियाकोस पानायोटू ; २५ जून,१९६३:ईस्ट फिंचली, मिडलसेक्स, इंग्लंड - २५ डिसेंबर, २०१६) हा एक इंग्लिश गायक-गीतकार आणि संगीत निर्माता होता. [] याच्या संगीताच्या जगभरात अंदाजे १० ते १२.५ कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.[] [] मायकेलला गीतलेखन, [] गायकी [] आणि दृश्य सादरीकरणातील सर्जनशील शक्ती म्हणून ओळखले जाते. [] [] त्याला दोन ग्रॅमी पुरस्कार, तीन ब्रिट पुरस्कार , बारा बिलबोर्ड संगीत पुरस्कार आणि चार एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक पुरस्सकारांह अनेक संगीत पुरस्कार जिंकले आहेत . बिलबोर्डच्या सर्वोत्कृष्ट १०० कलाकार" आणि रोलिंग स्टोनच्या २०० महान गायक यांमध्ये त्याचा समावेश आहे. [] मायकेलला २०२३मध्ये रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. []

१९९८ मध्ये मायकेलने आपण समलिंगी असल्याचे उघड केले आणि त्यानंतर त्याने एलजीबीटी व्यक्तींच्या हक्कासाठी प्रचार आणि एचआयव्ही/एड्स ला उपाय शोधण्यासाठी काम केले. त्याच वर्षी त्याला सार्वजनिक असभ्यतेसाठी अटक झाली आणि मादक पदार्थांशी संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये हा सापडला. २०११मध्ये मायकेला न्यूमोनिया झाला होता तेव्हा तो कोमात गेला, परंतु नंतर तो बरा झाला. २०१२ मध्ये लंडनच्या अर्ल्स कोर्टवर आपली अंतिम मैफिल केली. ऑक्सफर्डशायरच्या गोरिंग-ऑन-थेम्स शहरातील आपल्या राहत्या घरी २०१६ च्या ख्रिसमसच्या दिवशी मायकेलचे हृदयविकाराने निधन झाले.

मायकेल अँटवर्प, बेल्जियम, 2006 मध्ये सादरीकरण करत आहे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "George Michael: Chart topper and cultural icon dead at 53". CNN. 26 December 2016. 23 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Troubled personal life of pop superstar George Michael". Sky News. 27 December 2016. 26 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 December 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "KEEPING FAITH! WARNER CHAPPELL MUSIC RENEWS PUBLISHING DEAL WITH GEORGE MICHAEL'S ESTATE" (Press release). PR Newswire. 3 February 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2023 रोजी पाहिले.
  4. ^ Rubiner, Julia (1993). Contemporary Musicians: Profiles of the People in Music, Volume 9. Gale Research, Incorporated. p. 169. As a solo artist George Michael has been hailed as a leading creative force in popular songwriting. With fame approaching, Michael decided to change his name from the intimidating Georgios Panayiotou to the more accessible George Michael.
  5. ^ "The 20 best male singers of all time, ranked in order of pure vocal ability". Smooth Radio. 9 April 2020. 23 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 July 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "George Michael's Style: Remembering His Top 5 Iconic Looks". Billboard. 27 December 2016. 26 October 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 July 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Pop icon George Michael was a music video master". Mashable. 25 December 2016. 26 October 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 July 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "The 200 Greatest Singers of All Time". Rolling Stone (इंग्रजी भाषेत). 1 January 2023. 3 August 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 August 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "Rock and Roll Hall of Fame 2023 Inductees". The Rock and Roll Hall of Fame. 5 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 May 2023 रोजी पाहिले.