जॉयलँड (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉयलँड हा २०२२ चा पाकिस्तानी पंजाबी-भाषेतील नाट्यपट आहे. हा चित्रपट सैम सादिक यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केलेला आहे. अली जुनेजो, रस्ती फारूक, अलिना खान आणि सरवत गिलानी अभिनीत हा चित्रपट विस्तारित पितृसत्ताक राणा कुटुंबावर केंद्रित आहे, जे दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी आसुसलेले आहेत. [१]

या चित्रपटाचे जागतिक प्रदर्शन २३ मे २०२२ रोजी कान चित्रपट महोत्सव, २०२२ मध्ये झाले. तिथे याने "कॅमेरा डी'ओर" या पारितोषिकासाठी स्पर्धा केली होती. [२] कान्स चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित होणारा जॉयलँड हा पहिला पाकिस्तानी चित्रपट आहे. त्याच्या प्रदर्शनानंतर चित्रपटासाठी उभे राहून (स्टँडिंग ओव्हेशन) कौतुक केले गेले, [३] आणि पंच (जूरी) पारितोषिक [४] आणि क्विअर पाम पारितोषिक देखील मिळाले. [५] जॉयलँडने इतर तृतीयपंथी संकल्पनेवर ("LGBTQ थीम") आधारित चित्रपट जसे की लुकास धोंटचा "क्लोज" आणि किरील सेरेब्रेनिकोव्हचा "चैकोव्स्कीज वाइफ" यांना मागे टाकून हे पारितोषिक जिंकले. हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला. [६]

हा चित्रपट ९५ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटासाठी पाकिस्तानी प्रवेश म्हणून निवडला गेला. [७]

पटकथा सारांश[संपादन]

जॉयलँड ही लाहोरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा आहे ज्यात एक कठोर कुलपिता त्याच्या दोन मुलगे आणि सुनांवर हुकूम गाजवतो. त्याच्या मुलांनी त्याला नातवंडे द्यावीत अशी त्याची इच्छा आहे, पण जेव्हा त्याचा धाकटा मुलगा, हैदर, तिच्यासाठी नर्तकी म्हणून काम करणाऱ्या तृतीयपंथी बिबाच्या प्रेमात पडतो तेव्हा सर्व काही बदलते.

प्रदर्शन[संपादन]

२३ मे २०२२ रोजी ७५ व्या कान चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे जागतिक प्रदर्शन (वर्ल्ड प्रीमियर) झाले. [८] यूकेमधील फिल्म कॉन्स्टेलेशन आणि फ्रान्स-आधारित सेल्स फर्म या कंपन्यांनी या चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय हक्क हाती घेतले आहेत, जे उत्तर अमेरिकेतील प्रतिनिधित्वासाठी डब्ल्यू. एम.ई. इंडिपेंडेंटसह सामायिक केले जातील. [९] या चित्रपटाचे फ्रेंच हक्क कॉन्डोर कंपनीने विकत घेतले आहेत. [१०]

२०२२ च्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'विशेष सादरीकरणे' विभागात हा चित्रपट आमंत्रित करण्यात आला होता आणि ८ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. [११] [१२] २७ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'ए विंडो ऑन एशियन सिनेमा' विभागातही तो आला आणि [१३] ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला.

हा चित्रपट १८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार होता. [१४] तथापि, पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशाच्या चलचित्र अध्यादेश, १९७९ च्या कारणास्तव त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. [१५] [१६] अनेक आक्षेपार्ह कामुक दृश्ये हटवल्यानंतर हा निर्णय १६ नोव्हेंबर रोजी मागे घेण्यात आला, ज्यामुळे चित्रपटाच्या देशांतर्गत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. [१७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Barraclough, Leo (11 May 2022). "Cannes' Un Certain Regard Title 'Joyland' Swooped on by Condor in France (EXCLUSIVE)". Variety (इंग्रजी भाषेत). 25 May 2022 रोजी पाहिले.
  2. ^ Scott Roxborough (14 April 2022). "David Cronenberg, Park Chan-wook, Kelly Reichardt Set for Cannes Competition". The Hollywood Reporter. 25 May 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Cannes film festival gives standing ovation to Pakistani feature film 'Joyland': Watch". The News. 24 May 2022. 25 May 2022 रोजी पाहिले.
  4. ^ Christian Zilko (27 May 2022). "Cannes Un Certain Regard Winners: 'The Worst Ones' and 'Joyland' Take Top Prizes". IndieWire (इंग्रजी भाषेत). 28 May 2022 रोजी पाहिले.
  5. ^ "Pakistani trans drama 'Joyland' wins 'Queer Palm' as Cannes film festival accused of 'cold-shouldering' the LGBTIQ+ award". SBS (इंग्रजी भाषेत). 28 May 2022. 28 May 2022 रोजी पाहिले.
  6. ^ Narang, Gaurvi (October 6, 2022). "Pakistan's Oscar entry has Malala backing but fate of transgender Act tells a different story". The Print (इंग्रजी भाषेत). October 8, 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "'Joyland' is Pakistan's entry for Oscars 2023". The Express Tribune. 30 September 2022. 30 September 2022 रोजी पाहिले.
  8. ^ "Pakistani film 'Joyland' receives standing ovation at Cannes". The Times of India. 24 May 2022. 25 May 2022 रोजी पाहिले.
  9. ^ Ramachandran, Naman; Frater, Patrick (21 April 2022). "'Joyland' Cannes Film From Pakistan Picked up by Film Constellation, WME". Variety (इंग्रजी भाषेत). 25 May 2022 रोजी पाहिले.
  10. ^ Barraclough, Leo (11 May 2022). "Cannes' Un Certain Regard Title 'Joyland' Swooped on by Condor in France (EXCLUSIVE)". Variety (इंग्रजी भाषेत). 25 May 2022 रोजी पाहिले.
  11. ^ Welk, Brian (July 28, 2022). ""TIFF 2022 Lineup: Films From Tyler Perry, Peter Farrelly, Sam Mendes and Catherine Hardwicke to Premiere"". TheWrap (इंग्रजी भाषेत). July 29, 2022 रोजी पाहिले.
  12. ^ "Toronto International Film Festival; Special presentations: Joyland". Toronto International Film Festival. July 26, 2022. August 17, 2022 रोजी पाहिले.
  13. ^ "Joyland". Busan International Film Festival (इंग्रजी भाषेत). September 7, 2022. Archived from the original on 2022-11-21. September 16, 2022 रोजी पाहिले.
  14. ^ Narang, Gaurvi (October 6, 2022). "Pakistan's Oscar entry has Malala backing but fate of transgender Act tells a different story". The Print (इंग्रजी भाषेत). October 8, 2022 रोजी पाहिले.
  15. ^ Ramachandran, Naman; Ramachandran, Naman (2022-11-13). "Pakistan Bans Oscar Contender 'Joyland' for its 'Repugnant' Material". Variety (इंग्रजी भाषेत). 2022-11-13 रोजी पाहिले.
  16. ^ Ebrahim, Zofeen (15 November 2022). "'It's not against Islam': Pakistani trans actor tells of deep sadness over film ban". The Guardian. 15 November 2022 रोजी पाहिले.
  17. ^ "Film depicting transgender love affair to be screened in Pakistan". The Guardian. Agence France-Presse. 16 November 2022. 16 November 2022 रोजी पाहिले.