Jump to content

जॉन नॅश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जाॅन नॅश

जॉन फोर्ब्स नॅश जुनियर (१३ जून, इ.स. १९२८(:ब्लूफील्ड, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका - २३ मे, इ.स. २०१५:मन्रो टाउनशिप, न्यू जर्सी, अमेरिका) हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ होते.

बालपण[संपादन]

जॉन नॅश यांचे वडील अभियंता आणि आई शिक्षिका होत्या. जॉन शालेय वयातही खूप वाचायचे. त्यांना वाजविण्याची सवय होती. याच वयात, ई.टी. बेल यांचे झेन ऑफ मॅथेमेटिक्स या पुस्तकाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे ही इच्छा बदलून त्यांना गणितात संशोधन करण्याची इच्छा झाली.

गणिती जीवन[संपादन]

पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अत्यंत गुंतागुंतीची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले.

शक्याशक्यतावरचे संशोधन[संपादन]

सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईर्षा असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली.

उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसऱ्यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसऱ्याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एकना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली.

गेम थियरी[संपादन]

जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणाऱ्या बँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच गेम थियरी म्हणतात

प्रा. नॅश यांच्या आधी जॉन फोन न्यूमन यांनी गेम थियरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली.

मृत्यू[संपादन]

जॉन नॅश आणि त्यांची पत्‍नी ॲलिशिया यांचा मृत्यू त्यांची टॅक्सी एका लोखंडी संरक्षक कठड्याला आदळून झालेल्या अपघातात झाला.

जॉन नॅश यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

  • अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार
  • नॉर्वेजियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचा ’गणिताचे नोबेल प्राइझ म्हणून समजला जाणारा’ एबेल पुरस्कार
  • जॉन नॅश यांच्यी जीवनावर निघालेला 'अ ब्युटिफुल माइंड' हा अप्रतिम चित्रपट ’