जॉन डी. रॉकफेलर पहिला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन डेव्हिसन रॉकफेलर (जुलै ८, इ.स. १८३९ - मे २३, इ.स. १९३७) हा अमेरिकन उद्योगपती आणि दानकर्ता होता. याने स्टँडर्ड ऑइल कंपनीची स्थापना केली व त्याद्वारे अमेरिकेतील खनिज तेल उद्योगावर प्रभुत्व गाजवले. रॉकफेलरने आपल्या संपत्तीचे ट्रस्ट[मराठी शब्द सुचवा] केले व त्याद्वारे अमाप पैसा दान केला.

रॉकफेलरने स्टँडर्ड ऑइलची स्थापना ओहायोमध्ये आपला भाऊ विल्यम रॉकफेलर, हेन्री फ्लॅगलर, जेबेझ बॉस्टविक, सॅम्युएल अँड्रुझ आणि स्टीवन व्ही. हार्कनेस यांच्या भागीतारीत सुरू केली. जसजसे केरोसीनपेट्रोलचे भाव जगभर वाढत गेले तसतशी रॉकफेलरची मिळकतही. लवकरच तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाला. यावळी त्याची इस्टेत १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. चलनवाढ लक्षात घेता हा जगाच्या इतिहासातील सगळ्यात श्रीमंत माणूस ठरतो.[१][२][३][४]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Richest Americans". 
  2. .
  3. The Rockefellers.
  4. "The Wealthiest Americans Ever".