Jump to content

जैमिनी सूत्रम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कारकांशाद्वारे जाया फल विवेचन करा

१)  कारकांश म्हणजे आत्माकारक ( पत्रिकेतील सर्वाध‍िक अंशाचा ग्रह) नवांशात ज्या राशीत असतो त्याला लग्न संबंधीत समजुन इतर ग्रहाची मांडणी केली असता कारकांश कुंडली तयार होते.

२)  कारकांशात सातव्या स्थानावरून पत्नीचा विचार केला जातो.

३)  या मध्ये शुभ ग्रह असता- युतीत वा दृष्टीत असता पत्नी संबंधीत फळे शुभ असतात.

४)  यामध्ये पाप ग्रह- युतीत वा दृष्टीत असता फळांचा दर्जा खालावतो. मिश्र फळे मिश्र ग्रहांनी मिळतात.

आपण आता इतर ग्रहांचा सप्तमाशी संबंधीत विचार करूया.

१)   || लाभे चंद्र गुरूभ्यां सुंदरी||

कारकांशाच्या सप्तमात चंद्र वा गुरूची युती एवं दृष्टी असता जातकाला सुंदर स्त्री प्राप्त होते.

२)  || राहुणां विधवा||

कारकांशच्या सप्तम स्थानावर राहुची दृष्टी असता तर जातकाला विधवा पत्नी मिळते.

३)  || शनीनां वयोधीकरोगीनी तपस्वी वा||

  शनीची दृष्टी असता स्वतः पेक्षा जास्त वयाची रोगीणी व तपस्वी स्त्री मिळते.

४)|| कुजेन विकलांगी||

  कारकांशाच्या सप्तमात मंगळ असता स्त्री विकलांग व दोषपूर्ण शरीराची मिळते.

५)|| रवीणां स्वकुले||

  सप्तमात वा त्यावर दृष्टी जेंव्हा सूर्य देतो, तेव्हा नितात घरेलु स्त्री मिळते जी विकलांग असु शकते शिवाय ती पूर्ण जीवन चिंते मध्ये घालवते.

६)|| बुधेन कलावती||

जर कारकांशात सप्तमावर बुधाची दृष्टी असेल तर स्त्री गीत/वाद्य व ललीत कला संपन्न असते.

७)|| चापे चंद्रेणावृत्ते देशे||

  कारकांश कुंडलीच्या चतुर्थात चंद्र असता जातक प्रथम वेळ मोकळया आकाशाखाली स्त्री संगम करतो.

व्याख्याकार:

  डॉ.सुरेश चंद्र मिश्र                

                            पब्लिकेशन:

                           रंजन पब्लिकेशन