जैनदर्शन
Appearance
जैन हे तीन नास्तिक दर्शनांपैकी एक भारतीय दर्शनशास्त्र आहे.
जैन हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केले. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले.