जे. मंजुला
जे. मंजुला (इ.स. १९६२,:नेल्लोर, आंध्र प्रदेश, भारत - ) या भारताच्या संरक्षण दलातील वैज्ञानिक आहेत. यांनी संदेशवहन यंत्रणा अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्यात ज्यांनी मोठा हातभार लावला.[ संदर्भ हवा ]
कौटुंबिक माहिती
[संपादन]जे. मंजुला यांचे वडील जे.श्रीरामुलू हे नेल्लोर जिल्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर जे.मंजुला यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या शाखेतून अभियांत्रिकी पदवी मिळवली व काही काळ इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे काम केले.
मंजुला इ.स. १९८७ मध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट ऑर्गनायझेशनमध्ये रुजू झाल्या. हैदराबाद येथील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळेत त्यांनी २६ वर्षे काम केले.
या २६ वर्षांत मंजुला यांनी देशाच्या संरक्षण दलासाठी जलद व सुरक्षित संदेश ग्रहण करणारी अत्याधुनिक यंत्रणा व त्यासाठी लागणारी उच्च क्षमता रेडिओ लहरी प्रणाली विकसित केली. याशिवाय संरक्षण दलासाठी आवश्यक अशी अनेक सॉफ्टवेर त्यांनी विकसित केली आहेत.[ संदर्भ हवा ]
शत्रूकडून आपसात होणाऱ्या संदेश दळणवळणाचा छेद करून ते खंडित करण्यासाठीचे जॅमर, तसेच कंट्रोलर सॉफ्टवेरही मंजुळा यांनी विकसित केले आहेत. त्यांचे हे संशोधन लष्कर, हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दल या सर्वांसाठी उपयुक्त असून, तिथे त्यांचा वापर केला जात आहे.[ संदर्भ हवा ]
जे. मंजुला यांचा ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिम’ची रचना आणि विकास या क्षेत्रांत दांडगा अनुभव आहे. ‘डीएआरई’ विभागाच्या संचालकपदी असताना त्यांनी भारतीय हवाई दलात भारतीय बनावटीची ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली कशी वापरता येईल यावर काम करण्यास सुरुवात केली होती.[ संदर्भ हवा ]
जे. मंजुला जुलै २०१४ मध्ये डिफेन्स एव्हिऑनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट- डीएआरईच्या संचालक झाल्या. सप्टेंबर २०१५ मध्ये त्या संरक्षण संशोधन व विकास संस्था- डीआरडीओमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टिम्स विभागाच्या महासंचालकही झाल्या. या पदांवर नेमणूक झालेल्या भारतातील त्या पहिल्याच महिला होत. ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. के. डी. नायक यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
पुरस्कार
[संपादन]- मंजुला यांच्या कार्याची दखल घेऊन डीआरडीओने त्यांना अत्युत्कृष्टतेचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
- २०११मध्ये त्यांना सायंटिस्ट ऑफ इयर हा पुरस्कारही मिळाला.