जेंडर इन द हिंदू नेशन: आर.एस.एस. वूमन ॲज आयडिओलॉजीझ
जेंडर इन द हिंदू नेशन[१] निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे. या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे.आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते. ह्या पुस्तकाचे लेखन पाऊला बचेटा यांनी केले आहे.[२]
प्रस्तावना
[संपादन]जेंडर इन द हिंदू नेशन पुस्तकात पौला बचेता यांनी सखोल दृष्टीकोणातून लिहलेल्या तीन निबंधातून या संघटनेतील स्त्रियांची अत्यंत बारकाईने सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती यांच्या विचारधारेमधील भिन्नता हिंदू राष्ट्रवादी विचारसरणीतील स्त्रियांचे प्रतिनिधित्व आणि त्यांची भूमिका आणि हिंदू राष्ट्रातील स्त्रियांचे प्रतीकात्मक स्थान याबाबत या निबंधात बोलले गेले आहे. अनेक ऐतिहासिक साधने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रकाशनासारखी इतर माध्यमे, कागदपत्रे आणि वैयक्तिक मुलाखतींच्या आधारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक आणि हिंदू राष्ट्र याबद्दल वास्तवदर्शी चित्र निर्माण करतो.
ठळक मुद्दे
[संपादन]1. स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्री विकास।स्त्रियांचा विकास हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे तिने आदर्श कसे असले पाहिजे असे सांगते. 2. विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध,आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख, लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. 3.हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारसरणीचा मुख्य भाग म्हणून हिंदू राष्ट्रवादी महिला संघ मुख्य भूमिका निभावताना दिसतात
सदर पुस्तकातील १ला निबंध हिंदू राष्ट्रवादी स्त्रिया या "एक" विचार असून यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांची स्त्रियांची शाखा राष्ट्रीय स्वयंसेविका समिती या मोठ्या हिंदू राष्ट्रवादी संघटनाविषयी लिखाण केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जुनी संघटना असुन मुख्यत: ती पुरुषांसाठी आहे. हिंदू राष्ट्रवादी संघटनांच्या परिवारातील सर्वात ताकदवान आणि सर्वोच्च स्थानावर असलेली ही संघटना आहे. ही संघटना चळवळीची रचना करते आणि हिंदू "एकता" अशा संज्ञामध्ये आपल्या उद्धीष्टांची मांडणी करते. समिती ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील १ली संघटना आहे. या संघटनेद्वारे स्त्रियांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रती असलेली त्यांच्या दैवी कर्तव्याविषयी जाणीव करवुन देण्यासाठी नव्हे तर, स्त्रियांचा "विकास" हा कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संस्कृतीशी निगडीत असल्यामुळे स्त्रीने "आदर्श" असले पाहिजे असे सांगते. या स्त्रियांना संघटनेमध्ये एक प्रकारची दृश्यमानता आहे, जिथे त्यांना पद आहे,त्या भोवती त्यांचे आयुष्य घडत जाते. यांची विचारधारा संघाने तयार केली असली तरी जी विचारसरणी स्त्रियांची कर्तव्य समिती करते. तिच्या अंतर्गत स्त्रियांची केंद्रीय आणि दृश्यप्रतिमा घडविली जाते.स्त्रिया आपले नागरिकत्व आणि कर्तव्य कसे घडवतात? हे लेखिकेने अभ्यासपुर्ण पद्धतीने मांडले आहे.
या निबंधामध्ये दोन संघटनातील विविध विचारधारांमध्ये कशी भिन्नता आहे हे सांगितले आहे.या भिन्नतेमध्ये मात्र हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल एक मत आहे. आपल्या विविध हिंदी आणि इंग्लिश प्रकाशनामधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेविका समिती भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असा दावा करते, आणि त्यामुळे इतर धर्मिय आपोआपच त्यांचे प्राथमिक शत्रु बनतात. त्यांची ही विचारधारा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते पाठ्यपुस्तके, चित्रकथा, भित्तीपत्रे, निबंध, आत्मचरित्रे, वर्तमनपत्रातील लेख,लघुकथा अशी अनेक प्रकारची माध्यमे वापरतात. हिंदी आणि इंग्लिश मधील लिखाणे वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायांना संबोधित करतात. उदा. १९७८ साली प्रसिद्ध झालेल्या पोस्ट या प्रकाशनात १९३० सालच्या डाव्या उदारमतवादी स्त्रियांच्या चळवळींना विरोध केला आहे. यामध्ये पाश्चात्य प्रभावाखाली येवुन स्त्रिया समान हक्क आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढायला लागल्या असून त्यामुळे त्यांच्या कुटुंब आणि संस्कृती इत्यादी वर आघात करणारा आहे, तर (याविरुद्ध) हिंदी प्रचार साहित्यात निम्न आणि निम्नमध्यम वर्गीय स्त्रियांना संबोधित करत असुन त्यामध्ये पुरुष कसे हिंसाचार करतात आणि स्त्रियांनी त्याविरुद्ध लढा दिला पाहिजे, याची समीक्षा केली जाते.
आमच्या देवता सशस्र धारक आहेत त्यामुळे आम्ही हिंदू स्त्रिया या संस्कृती रक्षक आहेत. दुसरा निबंधामध्ये कमलाबेन आणि लेखिका यांच्यातील संभाषणातून काही विशिष्ट ठिकाणी (अहमदाबाद-गुजरात) हिंदू राष्ट्रवादाची विचारसरणी कशी रुजली याची मांडणी करतात. याशिवाय स्वतः आणि स्वतःची ओळख समितीच्या सदस्या कशा प्रकारे मांडीत होत्या हेही दिसते. कमलाबेन या समिती समर्पित कार्यकर्त्या होत्या, त्यांनी सांगितले की, त्या आपल्या भाषेत स्त्रीत्वाचा इन्कार करतात.
हिंदू राष्ट्रवादाची भाषा अत्यंत हुशारीने वळवून त्या स्वतःची स्त्री निर्माण करतात. जी स्त्री स्वतंत्र आहे पण त्यांना "इतर" आणि मुस्लिमांपासून भय आहे. लष्करी शिक्षण, स्त्रियांसारखे कपडे न घालणे या सारख्या अत्यंत अपरंपरागत माध्यमातून त्या सर्वसामान्य गर्गुती स्त्री प्रारूपाला विरोध करतात.अशा विविध माध्यमातुन त्या स्वतःच स्वातंत्र्य अधिक खुलवतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याशी लग्न करण्याची प्रथा नाकारून या उलट झाले पाहिजे असे सांगतात, कारण अशा लग्नामध्ये पुरुष वरचढ असतो. तोच नियम ठरवतो आणि लग्नानंतर जे एकत्र राहत नाही. अशा तऱ्हेने लग्न या मुद्यावर त्या स्वतःचे स्वातंत्र्य विस्थारीत करतात. असे असले तरी हिंदू राष्ट्रावादामध्ये मुसलमान दुश्मन असण्याच्या विचारसरणीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. एका अर्थाने पुरुषी वर्चस्व पासून दूर जाण्याचे प्रयत्न जे मर्यादित स्वातंत्र्याचा परिघात केले जातात. असे प्रयोग पुरुषी वर्चस्वाच्या रचनांमध्ये कोसळतात, आणि कमलाबेन या सारख्यांना मिळालेले मर्यादित स्वातंत्र्य हे त्या चौकटी अंतर्गत केवळ आघात प्रतिबंधक व्यवस्था म्हणून काम करतात. आणि कमलाबेन सारख्या बंडखोर स्त्रियांना मर्यादित करतात. शेवटच्या निबंधात जातीयवादी संपत्ती/ लैंगिक संपत्ती मुस्लिम स्त्रिया हिंसाचारी असतात. अशिऊ त्यांची प्रतिमा कशी बनविता येते याकडे लेखिका लक्ष वेधतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध साहित्य आणि लिखाणातून शत्रु स्त्रिया या जातीय आणि लैंगिक विन योजनासाठी उपलब्ध वस्तु आहे असे लिहले जाते. मुस्लिमांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करून मातृभूमीचे रक्षण केले पाहिजे. मुस्लिम पुरुषांना खच्ची केले पाहिजे. त्यासाठी मुस्लिम स्त्रियांना हीन मानले पाहिजे आणि हिंदू पुरुषांचे पौरुष्य घडविण्यासाठी आदर्श हिंदू स्त्रीची रचना केली पाहिजे अशी मांडणी केली जाते.[३]
संदर्भ सुची
[संपादन]- ^ Bacchetta, Paola (2004-01-01). Gender in the Hindu Nation: RSS Women as Ideologues (इंग्रजी भाषेत). Women Unlimited. ISBN 9788188965021.
- ^ "Paola Bacchetta | Department of Gender and Women's Studies". womensstudies.berkeley.edu (इंग्रजी भाषेत). 2018-03-24 रोजी पाहिले.
- ^ Anu, Sabhlok, (2005). "Book Review: Gender in the Hindu Nation: RSS women as Ideologues". Journal of International Women's Studies (इंग्रजी भाषेत). 7 (1). ISSN 1539-8706.CS1 maint: extra punctuation (link)