जीना राईनहार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीना राईनहार्ट ( ९ फेब्रुवारी, इ.स. १९५४ - ) ह्या ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध खाण व्यावसायिक आहेत. जीनाची आजपर्यंतची संपत्ती ही २९.३ अब्ज डॉलर्स इतकी असून, ऑस्ट्रेलियाची व्यापारपत्रिका बीआरडब्ल्यू प्रमाणे जीना जगातील सर्वांत श्रीमंत महिला आहे.

राईनहार्ट यांचे वडील लांग हॉनकॉक यांनी इ.स. १९५०च्या सुमारास ऑस्ट्रेलियामध्ये लोखंडाच्या मोठ्या साठ्याचा शोध लावला होता. मात्र त्या काळात लोखंडाचा साठा मर्यादित आणि दुर्लभ असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन सरकारने लोखंडाच्या निर्यातीवर बंदी आणली. त्यानंतर पश्‍चिमी ऑस्ट्रेलियाच्या पिलबारा खाणीच्या क्षेत्रात त्यांनी मोठ्या प्रमाणात रॉयल्टी[मराठी शब्द सुचवा] मिळविली आणि आता जीनाच्या परिवाराने जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळविले आहे.