जादव पायेंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जादव पायेंग
जन्म इ.स. १९६३
आसाम, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे मुलाई
कारकिर्दीचा काळ १९७९ ते आजतागायत
पदवी हुद्दा फॉरेस्टर
जोडीदार बिनीता पायेंग
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (२०१५)

जादव मोलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. ते आपले कार्य जोरहाट येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या अरुणा सापोर या वालुकादांडावर(सॅंडबार) करतात.१९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मृत सापांना बघुन त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर्धार केला. या बालुकादांडावर त्यांनी सुमारे १३६० एकर ( अंदाजे ५५० हेक्टर) जमिनीवर एकट्याने, कुणाची मदत न घेता, अनेक झाडे लावली. त्याच्या या कार्याची दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ[संपादन]

प्रा. अक्षता कुळकर्णी. 'झाडे लावणारा माणूस' -- तरुण भारत- ई-पेपर, आकांक्षा पुरवणी,दि. २१/०८/२०१५, पान क्र. ३ Check |दुवा= value (सहाय्य). नागपूर. २२/०८/२०१५ रोजी पाहिले. झाडे लावणारा माणूस |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)