जागतिक भाषांतर दिवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभ्यासात मग्न संत जेरॉम. डोमेनिको घीर्ललंदिओ यांनी काढलेले चित्र

जागतिक भाषांतर दिवस हा दरवर्षी ३० सप्टेंबरला [१] बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९९१ मध्ये मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.fit-ift.org/?page_id=3604 इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सची वेबसाईट (इंग्रजी मजकूर)