जांभळी लिटकुरी
शास्त्रीय नाव | Hypothymis azurea |
---|---|
कुळ | जल्पकाद्य (Muscicapidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
Black-naped Monarch Black-naped Blue Flycatcher |
वर्णन
[संपादन]जांभळी लिटकुरी हा पक्षी चिमणीच्या आकाराचा असून नर गडद निळ्या रंगाचा, मानेजवळ आणि छातीवर काळा कंठा, मादी फिक्या निळ्या राखाडी रंगाची, पोटाखालील भाग फिकट पांढरा आणि मानेजवळील व छातीवरील काळ्या कंठ्याचा अभाव. याच्या शेपटीचा आकार अर्धवट उघडलेल्या पंख्याप्रमाणे असतो.
वास्तव्य/आढळस्थान
[संपादन]मध्य भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार येथे भारतीय जात styani आढळते तर श्रीलंका येथे वेगळी जात ceylonensis आहे.
खाद्य
[संपादन]हा पक्षी मध्यम उंचीच्या झाडांपासून ते जमिनीपर्यंत सर्वत्र कीटक शोधत, नेहमी शेपटीचा पंखा हलवत राहणारा असून हा जोडीने किंवा इतर नाचऱ्या (नर्तक) पक्ष्यांसोबत राहतो.
प्रजनन काळ
[संपादन]याचा वीण हंगाम साधारणपणे एप्रिल ते ऑगस्ट असून याचे घरटे गवत आणि शेवाळे वापरून केलेले लहान आणि खोलगट, झाडाच्या दोन फांद्यांमध्ये व्यवस्थित बांधलेले असते. मादी फिकट गुलाबी रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली ३ ते ४ अंडी देते.
बाह्य दुवे
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |