जयप्रकाश अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयप्रकाश अग्रवाल (नोव्हेंबर ११, इ.स. १९४४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमधील चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतीलच उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. २००६ ते इ.स. २००९ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.