छोटा आर्ली (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोटा आर्ली

छोटा आर्ली (इंग्लिश: Small Pratincole)हा प्रॅंटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे.

हा आकाराने चिमणीएवढा असतो. करडया रंगाचा नदीकाठचा पक्षी. पाकोळीसारखे टोकदार पंख असतो. त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते.तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवाघुळासारखा दिसतो.त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला, धुरकट तपकिरी असतो. पोटाचा रंग पांढरा असतो.डोळे आणि चोचीला सांधणारी काळी पट्टी असते वर उडताना खालचा भाग पांढुरका आणि त्यावर काळ्या रेषा दिसतात. आखूड पांढऱ्या शेपटीवर काळा ठिपका असतो. छोटा आर्ली हे समूहाने राहतात.

चित्रदालन[संपादन]

वितरण[संपादन]

हे पक्षी पश्चिम पाकिस्तान, भारत, नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात.

फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते.

निवासस्थाने[संपादन]

त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली