Jump to content

छावा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छावा
दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर
निर्मिती मॅडॉक फिल्म्स (दिनेश विजान)
आधारित छावा कादंबरी - लेखक शिवाजी सावंत
प्रमुख कलाकार कलाकार
निवेदक अजय देवगण
संवाद ऋषी विरमणी
संगीत ए.आर. रहमान
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित १४ फेब्रुवारी २०२५
वितरक पेन स्टुडिओज, यश राज फिल्म्स
अवधी १६१ मिनिटे
निर्मिती खर्च १३० कोटी
एकूण उत्पन्न ७५२.८१ कोटी

छावा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित २०२५ चा भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक ऍक्शन चित्रपट आहे. यात संभाजी महाराजांची भूमिका विक्की कौशलने साकारली आहे, रश्मिका मंदन्ना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या मराठी कादंबरीवर आधारित आहे. याचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केले असून दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्स अंतर्गत निर्मिती केली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.[]

कलाकार

[संपादन]

प्रदर्शन

[संपादन]

सुरुवातीला ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट नंतर १४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[][] हा चित्रपट रशियामध्ये एकाच वेळी प्रदर्शित झाला.[][] छत्रपती संभाजी आणि त्यांच्या पत्नी लेझीम नृत्य सादर करत असलेल्या ट्रेलरमधील दृश्याबद्दल काही महाराष्ट्रीय राजकीय व्यक्तींकडून आलेल्या प्रतिक्रियांनंतर, उटेकर यांनी चित्रपटातून हे दृष्य काढून टाकले.[] छावा ११ एप्रिल २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.[]

बॉक्स ऑफिस

[संपादन]

छावाचा पहिला दिवस, विशेषतः महाराष्ट्र राज्यात, चांगला राहिला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ३३.१० कोटी (US$७.३५ दशलक्ष) कमाई केली.[] तर पहिल्या आठवड्याच्या शेवटी जगभरात १५७ कोटी (US$३४.८५ दशलक्ष) कमाई केली.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. "अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर झळकणार विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात, टीझर शेअर करत म्हणाला…". Loksatta. 2024-08-19. 2024-08-19 रोजी पाहिले.
  2. "Ajay Devgn joins Vicky Kaushal starrer Chhaava as the narrator". Bollywood Hungama. 13 February 2025. 13 February 2025 रोजी पाहिले.
  3. "Vicky Kaushal, Rashmika Mandanna starrer Chhaava gets postponed; to release on February 14". Bollywood Hungama. 27 November 2024. 27 November 2024 रोजी पाहिले.
  4. Aaglave, Ganesh (15 August 2024). "EXCLUSIVE! Chhava Vs Pushpa 2: How Vicky Kaushal starrer will get affected by Allu Arjun's pan-India biggie at the box office? Trade expert opines". Firstpost (इंग्रजी भाषेत). 16 August 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 August 2024 रोजी पाहिले.
  5. "Chhaava: Vicky Kaushal, Rashmika Mandanna's period drama to release in Russia". India Today. 28 January 2025. 11 February 2025 रोजी पाहिले.
  6. "Rashmika Mandanna starrer 'Chhaava' set to release simultaneously in Russia". The Times of India. 28 January 2025. 11 February 2025 रोजी पाहिले.
  7. "राज ठाकरे से मिले 'छावा' के डायरेक्टर, हटाया डांस सीन, बोले- संभाजी महाराज से बड़ा कुछ नहीं". आजतक. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
  8. "Chhaava (film 2025) / OTT Release This Week" (इंग्रजी भाषेत). 2025-03-12 रोजी पाहिले.[permanent dead link]
  9. "Chhaava gets post-midnight shows as late as 1:30 am in Mumbai due to crazy demand". Bollywood Hungama (इंग्रजी भाषेत). 15 February 2025. 15 February 2025 रोजी पाहिले.
  10. Dixit, Mohit (17 February 2025). "Chhaava Worldwide Box Office Weekend Update: Vicky Kaushal Powers Chhatrapati Sambhaji Maharaj's biopic to Rs 200 crore global haul". Pinkvilla (इंग्रजी भाषेत). 18 February 2025 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]