चेर्नोबिल दुर्घटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दुर्घटनेनंतर उध्वस्त झालेली अणुभट्टी

चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. एप्रिल २६ १९८६ रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामधील (आजच्या घडिला युक्रेनमधील) चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्राच्या ४ क्रमांकाच्या अणुभट्टीमधील एका चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटामध्ये भयानक अण्विक वाफांची गळती सुरू झाली व आजूबाजूच्या मोठ्या भागामध्ये ह्या वाफा पसरल्या. ही गळती थांबवण्याच्या व त्यामुळे लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये ५६ कर्मचारी व कामगारांचा मृत्यू झाला. परंतु सर्वदूर पसरलेल्या अण्विक वाफांच्या संसर्गातून झालेल्या कर्करोगामुळे सुमारे ४,००० लोक मृत्यूमुखी पडले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.[१]

ह्या दुर्घटनेमुळे येथील परिसर कायमचा प्रदुषित झाला आहे व डिसेंबर २००० सालापर्यंत ३.५ लाख नागरिकांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले.[२][३]

चेर्नोबिल विद्युत केंद्राचे युक्रेनमधील स्थान

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Elisabeth Rosenthal (International Herald Tribune) (6 September 2005). "Experts Find Reduced Effects of Chernobyl". New York Times. 11 September 2010 रोजी पाहिले. 
  2. ^ "Table 2.2 Number of people affected by the Chernobyl accident (to December 2000)". The Human Consequences of the Chernobyl Nuclear Accident. UNDP and UNICEF. 22 January 2002. पान क्रमांक 32. 17 September 2010 रोजी पाहिले. 
  3. ^ "Table 5.3: Evacuated and resettled people". The Human Consequences of the Chernobyl Nuclear Accident. UNDP and UNICEF. 22 January 2002. पान क्रमांक 66. 17 September 2010 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]