चेतन दत्ताजी गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेतन दत्ताजी गायकवाड (जन्म : ३ सप्टेंबर, इ.स. १९६६; - १२ फेब्रुवारी. इ.स. २००६) हा पुण्याच्या दत्ताजी गायकवाड नावाच्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. महाबळेश्वर येथील केट्सपॉईंटवरून पाय घसरल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला. चेतन गायकवाड याचे महाबळेश्वर व येथील निसर्ग सौंदर्यावर अतोनात प्रेम होते. त्याच्या स्मरणार्थ गायकवाड परिवार आणि त्यांच्या मिळकती व कंपन्यांचे ट्रस्टीज, भागीदार व कमिटी मेंबर अनेक सामाजिक उपक्रम व संस्था चालवितात. महाबळेश्वरजवळचे मेटगुदाड हे गायकवाड परिवाराचे मूळ गाव आहे. त्या गावी त्यांनी एक हायस्कूल काढले आहे.

चेतन दत्ताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या संस्था[संपादन]

  • चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश स्कूल, खडकी (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड एम.बी.ए. कॉलेज, कर्वे रोड (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड कम्युनिटी हॉल, दिवेआगर
  • चेतन दत्ताजी गायकवाड डायलिसिस सेन्टर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड नर्सिंग स्कूल , ताराचंद हॉस्पिटल (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड लायब्ररी, घोले रोड (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड विद्यालय, बावधन (पुणे)
  • चेतन दत्ताजी गायकवाड शैक्षणिक संकुल, चांदेगाव (अहमदनगर जिल्हा)
  • चेतन दत्ताजी गायकवाड हायस्कूल, मेटगुदाड (महाबळेश्वर)