चुक्ची समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियाच्या नकाशावर चुक्ची समुद्र

चुक्ची समुद्र (रशियन: Чуко́тское мо́ре) हा आर्क्टिक महासागराचा एक उप-समुद्र आहे. हा समुद्र रशियामधील सायबेरियाच्या ईशान्येस व अमेरिकेच्या अलास्का राज्याच्या पश्चिमेस स्थित आहे. चुक्ची समुद्राला पश्चिमेस व्रांगेल बेट पूर्व सायबेरियन समुद्रापासून वेगळे करते. चुक्ची समुद्राच्या पूर्वेस बूफोर्ट समुद्र तर दक्षिणेस प्रशांत महासागराचा भाग असलेला बेरिंग समुद्र आहे. बेरिंगची सामुद्रधुनी रशियाला उत्तर अमेरिकेपासून व चुक्ची समुद्राला बेरिंग समुद्रापासून अलग करते.