चीक
Appearance
झाडाच्या पानांमध्ये किंवा खोडामध्ये असलेल्या दुधासारख्या पांढऱ्या द्रवपदार्थाला मराठीत ‘चीक’ आणि इंग्रजीत लेटेक्स (Latex) म्हणतात. झाडाच्या खोडाला भोक पाडले की भोकातून असा चीक ओघळतो. नैसर्गिक रबर हा असाच एक चीक आहे.
उंबराच्या झाडापासून सूर्योदयापूर्वी असा चीक मिळवून तो गालगुंड बरा करण्यासाठी सुजलेल्या गालाला लावतात.
कृत्रिमरीत्या तयार केलेला लेटेक्स रंग बनवण्यास वापरतात.