चित्रा मुद्गल
Appearance
चित्रा मुद्गल | |
---|---|
जन्म नाव | चित्रा मुद्गल |
जन्म |
सप्टेंबर १०, इ.स. १९४४ चेन्नाई, तमिळनाडू, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्यलेखन |
भाषा | हिंदी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | आवा, एक ज़मीन अपनी, गिलिगडु |
वडील | ठाकुर प्रताप सिंह |
आई | विमला देवी ठाकुर |
पती | अवधनारायण मुद्गल |
चित्रा मुद्गल (जन्म : चेन्नाई, १० सप्टेंबर, १९४४) या एक हिंदी लेखिका आहेत. असे असले तरी त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. त्या एम.ए. (फाइन आर्ट) आहेत. सुधा होरास्वामीं या गुरूंकडून त्या भरतनाट्यम शिकल्या आहेत.
चित्रा मुद्गल यांची ४ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, ३ नाटके, १० बालकथा-नाटके आणि इतर अन्य पुस्तके मिळून सुमारे ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या आवा या कादंबरीचा त्याच नावाचा मराठी अनुवाद वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी केला आहे.
चित्रा मुद्गल यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- आपनी वापसी (कथासंग्रह)
- आवा (कादंबरी)
- इस हमाम में (कथासंग्रह)
- एक ज़मीन अपनी (कादंबरी)
- केंचुल (कथासंग्रह)
- क्रूसेड (कादंबरी)
- गिलिगडु (कादंबरी)
- ग्यारह लंबी कहानियॉं (कथासंग्रह)
- चेहरे (कथासंग्रह)
- जगदंबा (कथासंग्रह)
- जिनावर (कथासंग्रह)
- दुल्हिन (कथासंग्रह)
- पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा (मराठी अनुवाद डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, माधवी जोग)
- बाबू गॉंव आ रहे हैं (कथासंग्रह)
- लपटें (कथासंग्रह)
- लाक्षागृह (कथासंग्रह)
(अपूर्ण)