चितगाव कट
1930 uprising in British India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | raid, mutiny | ||
---|---|---|---|
स्थान | चट्टग्राम, Chattogram District, चट्टग्राम विभाग, बांगलादेश | ||
तारीख | एप्रिल १८, इ.स. १९३० | ||
| |||
चितगाव कट हा भारतीय स्वातंत्रयुद्धादरम्यान बंगालच्या चट्टग्राम शहरातील शस्त्रागारावर घातलेला छापा होता. सूर्यसेन हे या कटाचे सूत्रधार होते. अंबिका चक्रवर्ती, निर्मल सेन, गणेश घोष, प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्त यासारखे तरुण क्रांतिकारक यात सहभागी होते. नोव्हेंबर १९२९ला या कटाची योजना निशित करण्यात आली. त्यानुसार चितगाव या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या शहरातील दोन सरकारी शस्त्रगारांचा ताबा घेणे, तेथील दळणवळणाचे मार्ग तोडणे, शस्त्रास्त्राच्या मदतीने चितगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये ताब्यात घेऊन चितगाव जिल्हा स्वतंत्र्य करणे व अल्पावधीतच आसपासच्या प्रदेशावर ताबा प्रस्थापित करणे अशी ही व्यापक योजना होती. अतिशय जोखमीची असलेली ही योजना पार पाडण्यासाठी निरनिराळ्या कुशल व धाडसी तरुणाकडे एकेका कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार त्या त्या गटाला ती साधनसामग्री, हत्यारे व वाह्नेही पुरविण्यात आली होती. १८ एप्रिल १९३० रोजी या योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात झाली. रेल्वेमार्गावर सुरूंग पेरण्यात आले. टेलीफोन व टेलिग्रामच्या तारा तोडून शासकीय कार्यालयांना आगी लावण्यात आल्या. चितगाव येथील दोन्ही शस्त्रागारावर आकस्मिक हल्ले चढवून शस्त्रे ताब्यात घेण्यात आली व शस्त्रास्त्राच्या मदतीने युरोपीय अधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या. सूर्यसेन यांनी पत्रक काढून चितगाव येथे स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन झाल्याची घोषणा केली.