चिखलपान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चिखलपान 
Close wing position of Delias belladonna Fabricius, 1793 – Hill Jezebel Butterflies of Talle valley - 5.jpg
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
उपवर्गfeeding behavior
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Encharcamiento (es); Mud-puddling (fr); Mud-puddling (sv); ചെളിയൂറ്റൽ (ml); enfangament (ca); चिखलपान (mr); mud-puddling (en); 趋泥行为 (zh); Mud-puddling (it) Mud Puddling, Mud-puddling (ml)

चिखलपान (इंग्लिश:Mud puddling) ही कीटकांची, विशेषतः फुलपाखरांची चिखल,कुजलेले पदार्थ,प्राण्यांचा घाम यातून ते आवश्यक क्षार, खनिजे, सोडीयम,अमिनो आम्ले इ.शोषून घेण्याची क्रिया होय. या कीटकांना आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्ये परागकण व मधातून मिळत नाहीत म्हणून ते याप्रकारे पोषणमूल्ये मिळवतात.

सहसा हे कीटक थोडा चिखल असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र बसलेली दिसतात.

उन्हाळ्यात तापमान वाढलेले असताना जंगलात थोडे पाणी शिल्लक असलेल्या ओढ्यातील चिखलात चिखलपान करताना आढळतात. एका ठिकाणी जमलेली अशी रंगीबेरंगी फुलपाखरे अतिशय विलोभनीय दिसतात. अनेकविध जातींची फुलपाखरे अशा ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आलेली असतात. फुलपाखरे सतत उडत असल्यामुळे त्यांची एरव्ही छायाचित्रे घेणे कठीण असते पण चिखलपान करणारी फुलपाखरे छायाचित्रकारांसाठी सुद्धा एका पर्वणीच असते.

चित्रदालन[संपादन]