चालाकुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चालाकुडी हे भारताच्या केरळ राज्यातील तृशुर जिल्ह्यातील एक शहर आहे. याची लोकसंख्या १,१४,९०१ आहे. चालाकुडी नदीकाठी वसलेले हे गाव चालाकुडी तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असून हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४७वर कोचीपासून ३६ किमी उत्तरेस तर तृशुरपासून ३० किमी दक्षिणेस आहे.