चारुहास पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चारुहास पंडित हे प्रसिद्ध कला चित्रकार आहेत. शिक्षण : G. D. Art (Commercial Arts) प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’ च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढली. जपानी भाषेचा अभ्यास, स्कॉलरशिप मिळून जपान दौरा. कॉम्प्युटर ग्राफिक्स व कार्टून अनिमेशन मध्ये विशेष प्राविण्य. काष्ठ चित्र या नवीन कलाप्रकारातील चित्र निर्मिती व त्या कलेतील चित्रांसाठी स्वतःची ‘सृजन आर्ट’ नावाची ART GALLERY मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार. २००५ सालच्या ‘COSMOS’ पुरस्काराचे मानकरी. आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’ २०१०. ROTRACT CLUB चा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ २०१०. ‘कार्टूनिस्टस कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष.
सचिन कदम (शिषऱ्य) charuhas pandit is idol of sachin kadam. due to c. pandit sachin kadam complete our poem.

प्रकल्प[संपादन]

महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित होणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वी चे इंग्रजी विषयाचे बालभारती नावाच्या पुस्तकावर काम करतात. विशेषत: यातील चित्रे,साचा व अक्षर मांडणी याचे काम करतात.

कंपनी[संपादन]

चारुहास पंडितांची जाहिरात क्षेत्रातील स्वताची पॅन जाहिरात (pan ads.) नावाची कंपनी आहे.