चागई-१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चागई-१ ही पाकिस्तानने २८ मे १९९८ रोजी दुपारी १५:१५ वाजता घेतलेल्या भूमिगत अणुचाचणीच्या मोहिमेचे नाव आहे. बलुचिस्तान प्रांताच्या चागई जिल्ह्यातील रास कोह टेकडीवर या चाचण्या घेण्यात आल्या.

पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची पहिली सार्वजनिक चाचणी चागई-१ होती. त्याची वेळ ११ आणि १३ मे १९९८ रोजी भारताच्या दुसऱ्या अणुचाचणी (पोखरण २)ला थेट प्रतिसाद होता. पाकिस्तान आणि भारत यांच्या या चाचण्यांच्या परिणामीरोरूपात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा ठराव ११७२ स्वीकारण्यात आला आणि दोन्ही देशांवर आर्थिक निर्बंध लादण्यात आले. अण्वस्त्र उपकरणांची चाचणी करून पाकिस्तान सार्वजनिकपणे अण्वस्त्रांची चाचणी करणारे सातवे राष्ट्र ठरले. पाकिस्तानची दुसरी अणुचाचणी चागई-२ ही ३० मे १९९८ रोजी झाली.

पार्श्वभूमी[संपादन]

१९६० च्या दशकात आणि १९७० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच ऐतिहासिक आणि राजकीय घटना व व्यक्तिमत्त्वांनी पाकिस्तानला हळूहळू उद्युक्त केले. जेणे करून १९७२ मध्ये अण्वस्त्रांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. १९७४ पासून अण्वस्त्र तपासणीच्या योजना सुरू झाल्या.

२००५ मध्ये, बेनझीर भुट्टो यांनी अशी खबर दिली होती की कदाचित यापूर्वी पाकिस्तानकडे अण्वस्त्र यंत्र असू शकले असते आणि त्यांचे वडील (झुल्फिकार अली भुट्टो) यांनी १९७७ मध्ये आण्विक चाचण्यांची तयार केली होती आणि ऑगस्ट १९७७ मध्ये अणुचाचणीची अपेक्षा पण होती. तथापि, ही योजना डिसेंबर १९७७ मध्ये विलंबीत केली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय पडसाद टाळण्यासाठी अनिश्चित काळासाठी विलंब करण्यात आला.

स्थान[संपादन]

ऑपरेशनच्या संरक्षणासाठी दुर्गम आणि वेगळा डोंगराळ भाग आवश्यक होता. पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाने आतून २०४० किलोटन विस्फोट सहन करण्यास सक्षम असा पर्वत निवडण्यासाठी चाचण्या केल्या. आण्विक सामग्री बाहेर कमी प्रमाणात पसरावी म्हणून कोरडे हवामान आणि अगदी कमी वाऱ्याची आवश्यकता होती. म्हणून रास कोह टेकडी निवडली गेली.[१]

ऑपरेशन आणी प्रतिक्रिया[संपादन]

इस्लामाबादमधील फैजाबाद इंटरचेंज येथे चागाई-१ चे स्मृतीस्थळ.

पाकिस्तान अणु उर्जा आयोगाने २८ मे १९९८ रोजी दुपारी १५:१५ वाजता वाजता चागई चाचणीच्या जागेवर पाच भूमिगत अणुचाचण्या केल्या. पाकिस्तानमध्ये आण्विक स्फोटांची बातमी समजताच आनंद आणि समारंभ रस्त्यावर पसरला. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय वाहिनी पाकिस्तान टेलीव्हिजन (पीटीव्ही)च्या माध्यमातून देशाला संबोधित केले आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.

युरोपियन युनियन, अमेरिका, जपान, इराक आणि इतर अनेक देशांनी चागाई-१ चाचण्यांचा निषेध केला. दुसरीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि इराणने पाकिस्तानचे अभिनंदन केले.

पाकिस्तानमध्ये २८ मे हा दिवस "यम-ए-तकबीर" (म्हणजे "महानतेचा दिवस") म्हणून साजरा केला जातो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "When Mountains Move – The Story of Chagai". The Nation and Pakistan Defence Journal. १ अप्रेल २०१२. Archived from the original on 2012-04-01. 14 नवम्बर 2019 रोजी पाहिले. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)