चाकरवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.श्रीक्षेत्र चाकरवाडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थानजगताच्या कल्याणासाठी संत महात्मे भगवंताच्या इच्छेने पृथ्वीवर अवतीर्ण होत असतात. अध्यात्माच्या दारिद्रय़ अवस्थेत जीवनाची कालक्रमणा करणारे जे अज्ञानी आहेत व तथाकथित वेदशास्त्र पुराणे आदी ग्रंथाचे परिशिलन करूनही ज्यांना ईश्‍वर ओळखता आले नाही. अशा सुज्ञ व अज्ञानी लोकांना ईश्‍वराची खरी ओळख व अनुभूती देण्याकरिता संत तळमळीने आपले जीवन सर्मपित करीत असतात. आम्ही वैकुंठवासी। आलो याची कारणासी। विषय तो त्याचा झाला नारायण। दीन रजनी हाचि धंदा। गोविंदाचे पोवाडे।' या श्री संत सद्गुरू तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे जीवनयात्रा यावर चालत असते. योगीराज ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात. ब्रह्मंडामध्ये ही परिक्रमा अनादीकालापासून चालू आहे, यात कसलाही खंड नाही व बदलही नाही. तया ब्रह्मच्या अधिपत्याखाली ही यंत्रणा कार्यरत आहे. श्रीमद्भगवतगीतेमध्ये श्री भगवान म्हणतात....'मयाध्यक्षेण प्रकृती : सुयते स चराचरम। अहं हि सर्व यज्ञाना भोक्ताच प्रभुरेवचे।।' माझ्या सत्तेमुळे ही प्रकृती विकसित होते, विलय पावते. कोणत्याही कार्यकारणचे अधिष्ठान मीच आहे. या मायेचे पाश तोडून तिच्या मोहातून मुक्त होवून जो माझी कास धरतो ते मला येवून मिळतो. संत ज्ञानेश्‍वर माऊली म्हणतात, एथ एकची लीला तरले। जे सर्व भावे मजसी भजले। तयाचे ऐलथडीचे सरले। मायाजाल। अशा भगवंताच्या विश्‍वात बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील श्रीक्षेत्र उत्तरेश्‍वर (पिंपरी) या छोट्याशा ग्रामी एक अजन्मा जन्मासी आला त्या अनामाचे निर्देश नाम होते सद्गुरू ज्ञानेश्‍वर माऊली महाराज! ब्रह्मतेजानं माऊलीचे मुखमंडल विलासित होत होत माऊलींचे अर्धेअधिक आयुष्यमान पिंप्रीच्या वास्तव्यास व्यतीत झालं. ज्यांना श्रीरामभक्त श्री हनुमंताचा अवतार मानतात म्हणूनच की काय श्रीरामाची उपासना केली. निष्ठावंत रामभक्त पुढे चाकरवाडीला वास्तव्यास आल्यानंतर त्या ठिकाणी भव्य राममंदिराची वास्तु आकारित केली व प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली. अखंड नामस्मरण प्रवचन, कीर्तन या माध्यमातून त्यांनी विश्‍वपुरूषाची सेवा केली. त्यांचे कीर्तन ऐकण्यास आलेल्या अबालवृद्ध ज्ञानी-अज्ञानी सर्वच स्तरातील लोकांना सोप्या बोलीभाषेतून परब्रह्मचे रहस्य उलगडून दाखवीत. नामाची गोडी सत्संगाची ओढ लागून कीर्तनस्थळाचे पंचक्रोशीतील हजारोंचा श्रोतावृंद आवर्जून उपस्थित राहत असे. श्रोतीय, ब्रह्मनिष्ठ जीवनमुक्त अवस्थेमध्ये असून देखील त्यांनी कधीच लोकांवर अधिकार गाजवलेला नाही. जे जे भेटे भूत । तो ते मानीजे भगवतं। हा भक्तीयेग निश्‍चित। जाण माझा।' या जाणीवेतून त्यांनी आयुष्यभर नामभक्तीचा अंगिकार केला. सिद्धीच्या जोरावर ईश्‍वरी सत्तेच्या विरूद्ध चौदाशे वर्षांपर्यंत चांगदेव जगले होते. पण ब्रह्मज्ञानापासून ते फार दूर होते. आत्मस्वरूपाची जाण नव्हती. साक्षात्कार नव्हता त्या चांगदेवाना मुक्ताबाईंनी चेटक्या संबोधले. शेवटी तिच्याच उपदेशाने चांगदेव पूर्णवस्थेला प्राप्त झाले. श्री माऊली महाराजांनी अमरत्व भोगता आले असते. परंतु, आयुर्मयादा आणि योग्य काल येताच पंचमहाभूतात्मक नश्‍वर देह काळाच्या स्वाधीन करून निर्वाणपदाची प्राप्ती त्यांनी करून घेतली. हे त्यांच्या अवतार कार्याची वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांच्या ठायी अनेक महासिद्धी आश्रयास असत, त्या अष्टसिद्धीचे आश्रयस्थान म्हणजे श्री माऊली महाराज होते. पूज्य माऊलींच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे अखंड हरिनाम व पूर्णब्रह्मचे प्रदान होय. जीवन करी जीवीत्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म। अन्नद् भवन्ति भूतानी व अन्नम् ब्रrोती।। या उपनिषद वचनान्वये त्यांनी हयातभर अन्नसंतर्पण हा यज्ञ अखंड चालू ठेवला. आजही दर अमावस्येला मोठी पर्वणी असते. हजारो, लाखो भाविक उभ्या महाराष्ट्रातून माऊलींच्या दर्शनासाठी येतात. त्यावेळेच्या र्मयादेत भक्तांना प्रसाद मिळतो. परंतु, सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत किंवा त्यानंतरही वेळेच्या बंधनाशिवाय सदासर्वकाभ अन्नसंतर्पणाचे श्री क्षेत्र चाकरवाडी हे एकच क्षेत्र म्हणावे लागेल. कुठल्याही भक्ताने कोणत्याही वेळी आगमन करावे, माऊलींचे दर्शन घ्यावे, तृप्त प्रसाद सेवन करून मार्गस्थ व्हावे, अशी या क्षेत्राची वंदना व आचारसंहिता आहे. अशा लोकोत्तर महावैष्णवाचे निर्वाण होवून बारा संवत्सराचा काल व्यतीत झाला आहे. श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे श्री माऊली महाराजांचे भव्य, रमणीय, पवित्र अशी समाधी मंदिराची वास्तु विराजमान असून, श्री माऊली या ठिकाणी कालातीत राहून चिरविश्रांती घेत आहेत. प्रतिवर्षी महापुण्यतिथीच्या निमित्ताने लाखो भाविक भक्त या ठिकाणी येवून विठ्ठल नामाच्या अनाहत गजरात माऊलींची सेवा करतात.धन्य होतात. माऊली महाराजांचा भक्त परिवार फार मोठा आहे. लाखो भक्त भाविकांनी माऊलींची अत्यंत निष्ठेने, श्रद्धेने सेवा केली. आजही अमावस्येच्या वारीला भक्त मंडळी येते. भक्तीचा आदर्श म्हणावा अशी त्यांची अविरतपणे करतात. भगवतगीतेतील वचनानुसार आत्मा अमर आहे. म्हणूनच सर्व भक्तांची सेवा कालातील आहे व माऊली या अजरामर आहेत. कृपा कटाक्षे न्याहळीले आपुल्या पदी बैसविले. माऊली महाराजांचे सान्निध्यात, नामात सेवन भक्तीचे जीवन कृतार्थ होवून चिरंतन अमरत्व प्राप्त होते. एवढी पुण्याई माऊलीनामात त्यांचे सेवेत आहे, ही त्यांच्या लाखो कोटी भक्तगणांची भावना आहे. अशा या थोर लोकोत्तर महावैष्णव श्री माऊली महाराजांच्या चरणी, अनंत कोटी प्रणाम.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]